मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:16 AM2021-09-07T04:16:11+5:302021-09-07T04:16:11+5:30

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महानुभावांच्या गत ३० ...

Marathi University should be located at Ridhpur | मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच व्हावे

मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच व्हावे

Next

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महानुभावांच्या गत ३० वर्षांपासून असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीला अनुकूलता दर्शवली. परंतु, हे विद्यापीठ मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ रचल्या गेलेल्या रिद्धपूर (ता. चांदूर बाजार जि. अमरावती) येथेच व्हावे, अशी मागणी महानुभाव साहित्य महामंडळाच्यावतीने करण्यात आली.

मराठी भाषेत गद्य, चरित्र, व्याकरण, कोशग्रंथ यांसोबतच काव्यग्रंथाचेही लेखन महानुभव साहित्यिकांनीच सर्वप्रथम केले. मराठी भाषेतील पहिला गद्य व चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’चे संकलन पंडित म्हाइंभट यांनी केल्यावर रिद्धपूर येथेच बाराव्या शतकात संपादन कार्य पूर्णत्वास गेले. मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणाऱ्या आणि संस्कृतऐवजी लोकभाषा मराठीतून साहित्यनिर्मिती करणाऱ्या महानुभवांची साहित्यसंपदा अजूनही उजेडात आली नाही. त्यामुळेच मराठी विद्यापीठाची गत ३० वर्षांपासून मागणी लावून धरली आहे. मराठी विद्यापीठाची रिद्धपूर येथे स्थापना झाल्यास अनेक हस्तलिखिते व सांकेतिक लिपी नव्याने जगासमोर येतील. त्यामुळे रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम नागपुरे, श्रीकृष्ण बनसोड, ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे मार्गदर्शक प.पू. विनयमुनी उपाख्य वैरागीबाबा, प्रवीण बनसोड, जितेंद्र रोडे यांनी केली आहे.

Web Title: Marathi University should be located at Ridhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.