२२ मार्चला दिवस-रात्र एकसमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:12 PM2018-03-21T22:12:29+5:302018-03-21T22:12:29+5:30

गुरवार, २२ मार्च रोजी दिवस-रात्र एकसमान राहणार असून, या दिवशी दिवस व रात्र १२ तासाचे म्हणजे समान राहणार असल्याची माहिती हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

On March 22, day-night uniform | २२ मार्चला दिवस-रात्र एकसमान

२२ मार्चला दिवस-रात्र एकसमान

Next
ठळक मुद्देहौशी खगोलीय अभ्यासकांची माहिती

आॅनलाईन लोकमत
अमरावती : गुरवार, २२ मार्च रोजी दिवस-रात्र एकसमान राहणार असून, या दिवशी दिवस व रात्र १२ तासाचे म्हणजे समान राहणार असल्याची माहिती हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
दिवस-रात्र नेहमीच लहान-मोठे असतात. दिवस-रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे निर्माण होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्थ सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासांपेक्षा मोठा व रात्र १२ तासांपेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्थ सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र एकसमान असते. दोन्ही गोलार्थ सूर्यापासून समान अंतरावर असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्त उत्तर व दक्षिण धु्रवाकडे जाते. म्हणूनच २२ व २३ सप्टेंबर या दिवशी दिवस-रात्र एकसमान असतो, अशी माहिती गिरुळकर यांनी दिली.

Web Title: On March 22, day-night uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.