मार्च-एप्रिल सर्वाधिक जागतिक दिनांचे महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:30 PM2019-03-04T12:30:31+5:302019-03-04T12:31:25+5:30
दरवर्षी कॅलेंडर वर्षात ‘मार्च-एप्रिल’ जागतिक दिन घेऊन येतात. यात सर्वाधिक जागतिक दिन मार्च महिन्यात साजरे होतात.
अनिल कडू
अमरावती : दरवर्षी कॅलेंडर वर्षात ‘मार्च-एप्रिल’ जागतिक दिन घेऊन येतात. यात सर्वाधिक जागतिक दिन मार्च महिन्यात साजरे होतात.
वन्यजीवांचे महत्त्व आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा जागतिक वन्यजीव दिन ३ मार्चला असतो. ८ मार्च हा जागतिक महिला दिन, १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन, १७ मार्चला जागतिक अपंग सहाय्यता दिन, २१ मार्चला जागतिक वनदिन, २२ मार्चला जागतिक जलदिन, २३ मार्च हा जागतिक हवामान दिन असून २४ मार्च हा जागतिक क्षयरोग निवारण दिन, २६ मार्च जागतिक संगीतोपचार दिन, २७ मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरे केले जातात. मार्च महिन्यात एकूण नऊ जागतिक दिन येतात. या जागतिक दिनासोबतच ४ मार्च संत गाडगेबाबा जयंती, १० मार्च कवी कुसुमाग्रज व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन, ११ मार्चला छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, १४ मार्च राष्टÑकुल दिन, २३ मार्च क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शहीद दिन, २९ मार्च राष्टÑीय नौका दिन पाळले जातात. १२ मार्चला यशवंतराव चव्हाण जन्मदिन आहे. खरे तर मार्च महिन्याची सुरूवातच नागरी संरक्षण दिनाने होते. १ मार्चला नागरी संरक्षण दिन, ३ मार्च हा राष्टÑीय ग्राहक दिन संबोधले जाते.
मार्च महिन्याप्रमाणेच एप्रिलमध्येही महत्त्वपूर्ण दिवस आहेत. ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन, १८ एप्रिल जागतिक वारसा दिन, २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन, २९ एप्रिलला जागतिक नृत्य दिन आहे. मराठी नववर्षाची सुरूवात गुढीपाडवा ६ एप्रिलला असून १३ एप्रिलला श्रीरामनवमी आणि जालियनवाला बाग स्मृतिदिन आहे. १० एप्रिलला डॉ. पंजाबराव देशमुख पुण्यतिथी असून, ११ एप्रिलला महत्मा फुले जयंती आहे, तर १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. याच दिवशी श्री रामदास स्वामी जयंती आणि अग्निशामन दल दिन आहे.
१७ एप्रिल श्री महावीर जयंती तर १९ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती आणि गूडफ्रायडे आहे. २४ एप्रिल जलसंपत्ती दिन व ३० एप्रिल बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.