मार्च एन्डिंगचा आठवडा सुट्यांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:15+5:302021-03-24T04:13:15+5:30
अमरावती : मार्च एन्डिंगचा दबाव कर्मचाऱ्यांवर असतानाच, बँक कर्मचाऱ्यांना सुट्यांचा बोनसही मिळाला आहे. विविध कारणांनी सलग २७ ते ...
अमरावती : मार्च एन्डिंगचा दबाव कर्मचाऱ्यांवर असतानाच, बँक कर्मचाऱ्यांना सुट्यांचा बोनसही मिळाला आहे. विविध कारणांनी सलग २७ ते ३० मार्चपर्यंत व त्यापुढे १, २ आणि ४ एप्रिलला बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे.
मार्च महिन्यात १३ ते १६ मार्च असे चार दिवस सरकारी बँक बंद होत्या. खाजगीकरणाविरुद्ध पुकारलेला संप १५ आणि १६ मार्चला झाला. त्यापूर्वी दुसरा शनिवार व रविवार होता. यादरम्यान कोट्यावधी आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा बँकांना सलग सुट्या आल्या आहेत.
बँकांमध्ये आर्थिक ताळेबंद तयार करण्याची घाई सुरू आहे. अशातच कोरोनामुळे आलेल्या निर्बंधाने कर्मचारी उपस्थितीही रोडावली आहे. बँकांबाबत आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे असल्यास ते २६ मार्चपर्यंत करणे आवश्यक होऊन बसले आहे. त्यानंतर आठ दिवस बँकांना सुट्या राहतील. त्याचा एटीएमवर भार पडणार आहे.
बॉक्स
अशा आहे सुट्या
२७ मार्च - दुसरा शनिवार,२८ मार्च - रविवार,२९ मार्च - धूलिवंदन, ३० मार्च - अखेरचा दिवस, ३१ मार्च - सार्वजनिक व्यवहार बंद,१ एप्रिल - अकाउंट क्लोजिंगचा दिवस, २ - एप्रिल गुड फ्रायडे,४ एप्रिल - रविवार