विवाहितेचा छळ; पतिसह सासऱ्याला तीन वर्षाचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:12+5:302021-09-16T04:17:12+5:30
विधीसुत्रानुसार, आरोपी उज्वल बोचरे याचे २६ फेब्रुवारी २००७ रोजी दिग्रस येथे लग्न झाले. पीडिता सासरी परतवाडा येथे ...
विधीसुत्रानुसार, आरोपी उज्वल बोचरे याचे २६ फेब्रुवारी २००७ रोजी दिग्रस येथे लग्न झाले. पीडिता सासरी परतवाडा येथे एकत्र कुटुंबात राहावयास आली. २००८ मध्ये बोचरे दाम्पत्याला मुलगी झाली. आरोपीने लगनापूर्वी कर्ज काढले होते. ते फेडण्यासह फर्निचरचे दुकान टाकण्याकरिता उज्वलने पत्नीला माहेरून सहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. दारू पिऊन शिवीगाळ, मारझोड करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यात सासरा देखील सहभागी झाला. त्रासाला कंटाळून विवाहितेने परतवाडा पोलिसात २०१४ मध्ये फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपासी अंमलदार पुरुषोत्तम यावले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता पंकज माहुरे यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. त्यावरून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. पाच हजार रुपये तून चार हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश दिले. याप्रकरणात पीडितेच्या वडील व भावाची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.