बाजार समिती संचालक मंडळांना मुदतवाढ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:13 AM2021-04-24T04:13:54+5:302021-04-24T04:13:54+5:30

परतवाडा (अमरावती) नरेंद्र जावरे : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला राज्य शासनाने कोरोना संक्रमण पाहता निवडणुका ...

Market Committee Boards of Directors No Extension! | बाजार समिती संचालक मंडळांना मुदतवाढ नाही!

बाजार समिती संचालक मंडळांना मुदतवाढ नाही!

Next

परतवाडा (अमरावती) नरेंद्र जावरे : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला राज्य शासनाने कोरोना संक्रमण पाहता निवडणुका घेणे शक्य नसल्यामुळे सहा महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली आहे. परंतु या शासन निर्णयात ज्या बाजार समितीच्या संचालक मंडळाची अनियमिततेबाबत तक्रार वजा चौकशी सुरू आहे, अशा संचालक मंडळांना मुदतवाढ नाकारण्यात आली आहे.

अचलपूर बाजार समिती संचालक मंडळाविरुद्ध गंभीर आरोप आहेत. त्यामुळे पोलीस चौकशी सुरू आहे. येथील सहकार क्षेत्रात या शासन आदेशाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोरोना संक्रमणाचा वाढता धोका पाहता सर्वच प्रकारच्या निवडणुका घेण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत मुदतवाढ देणे हाच एकमेव पर्याय शासनापुढे आहे. परिणामी कार्यकाळ पूर्ण झालेल्या बाजार समितीच्या संचालकांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. राज्य शासनाचे उपसचिव का. गो. वळणी यांनी २२ एप्रिल रोजी सर्व बाजार समिती संचालक मंडळासाठी आदेश निगर्मित केला आहे. १६ एप्रिल रोजी अचलपूर बाजार समितीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

बॉक्स

अनियमिततेची चौकशी, मुदत वाढ नाही

ज्या संचालक मंडळाचा आधीचा कार्यकाळ पूर्ण झाला अशा संचालक मंडळांना २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याच आदेशात मुदतवाढीच्या कालावधीत ज्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे, अशांविरुद्ध अनियमिततेबाबत तक्रारी आहेत व अशा तक्रारीनुसार प्रत्यक्ष चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी संचालक मंडळे वगळून इतर संचालक मंडळांना ही मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

कोट

अचलपूर बाजार समितीला १६ एप्रिल रोजी मुदतवाढ मिळाली. राज्य शासनाने २२ एप्रिल रोजी नवीन अध्यादेश काढला. त्यामुळे बाजार समिती संचालक मंडळ सहा महिन्यांसाठी कायम राहील.

- संदीप जाधव,

जिल्हा उपनिबंधक, अमरावती

Web Title: Market Committee Boards of Directors No Extension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.