बाजार समितीचे कामकाज बंद, कोट्यवधींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:57+5:302021-07-10T04:10:57+5:30
अमरावती : केंद्र सरकारने दाळ व इतर धान्याच्या स्टॉक लिमिटवर निर्बंध लादल्याने व्यापारी व खरेदीदारांमध्ये नाराजीचा सूर ...
अमरावती : केंद्र सरकारने दाळ व इतर धान्याच्या स्टॉक लिमिटवर निर्बंध लादल्याने व्यापारी व खरेदीदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. या नियमाच्याविरुद्ध बाजार समितीतील धान्याची खरेदी ५ जुलैपासून बंद असल्याने पाच दिवसांपासून कोट्यवधींचे व्यवहार ठप्प आहेत. अमरावती बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समितीतसुद्धा खरेदी बंद आहे. केंद्र सरकारया निर्णयाचा राष्ट्रीय स्तरावर विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी व्यापारी, खरेदीदार या निर्णयाविरुद्ध आंदोलन करीत आहेत. अमरावती, अकोला, नागपूर येथे डाळीचे सर्वाधिक उत्पादन होते. त्यामुळे सर्वाधिक फटका विदर्भातील व्यापाऱ्यांना बसत असल्याने या याविरोधात बेमुदत बंदचे शस्त्र खरेदीदार असोसिएशनचे उगारले आहे. १० जुलै रोजी पुढील कामकाज सुरू करण्यासंदर्भात अमरावती व्यापारी संघटनेची बैठकी होणार आहे. बाजार कधी सुरू होईल ते उद्या कळेल, असे सूत्रांनी सांगितले.