बाजार समितीत शेतमालाची आवक घटली, दरही घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:50+5:302021-05-06T04:12:50+5:30

अमरावती बाजार समितीत बहुतांश ठिकाणांहून शेतमाल विक्रीकरिता येतात. मागील १५ दिवसांत शेतमालाच्या दराने उचांकी गाठल्याने खरीप हंगामासाठी राखून ठेवलेला ...

In the market committee, the income of agricultural commodities decreased and the prices also declined | बाजार समितीत शेतमालाची आवक घटली, दरही घसरले

बाजार समितीत शेतमालाची आवक घटली, दरही घसरले

Next

अमरावती बाजार समितीत बहुतांश ठिकाणांहून शेतमाल विक्रीकरिता येतात. मागील १५ दिवसांत शेतमालाच्या दराने उचांकी गाठल्याने खरीप हंगामासाठी राखून ठेवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस आणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आवक वाढली होती. मात्र, दरात काहीशी घट होताच आवकदेखील घटली आहे. २३ एप्रिल रोजी सोयाबीन ७३०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आला. २४ एप्रिल रोजी उत्तम दर्जाचे सोयाबीन ७६०० रुपयांनी विक्री करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीस आणण्यास सुरुवात केल्याने आवक वाढताच दर कमी झाले. त्यामुळे सध्या शेतमालाची आवकदेखील घटल्याचे बुधवारी दिसून आले.

बॉक्स

आठ दिवसांतील दर, आवकमधील फरक

शेतमाल २८ एप्रिल आवक दर ५ मे आवक दर

गहू १४८२ १८५०-१९५० ८६३ १८५०-१९५०

तूर २२६४ ६६००-६८०० १९०८ ६४५०-६६५०

चणा २७६४ ४८५०-५२०० २२३७ ४७५०-४९५०

सोयाबीन ५७२५ ६६५०-७१०० १२३३ ६६५०-७१००

मका १२८ १२००-१२५० ६ १२००-१२५०

प्रतिक्रिया

चणा, सोयाबीन, गहू तुरीचे भाव वरिष्ठ पातळीवरून कमी झाले. त्यामुळे शेतमालाचीही आवक घटली आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना वरिष्ठ पातळीवर केलेल्या व्यवहाराचे पैसे वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या धान्याचा चुकारा करणे अवघड जात आहे.

- गोपालदास लढ्ढा,

व्यापारी

--

भावात हजार-बाराशे रुपयांनी घट झाल्याने शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे दिवसभर चालणारी खरेदी-विक्रीची कामे दुपारपर्यंत आटोपून निरवशांतता पहायला मिळत आहे. याहीपेक्षा दर कमी होण्याच्या भीतीने काही शेतकरी शेतमाला विक्रीस आणत असल्याने थोडीफार खरेदी सुरू आहे.

- आशिष करवा, दलाल

--

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी नुकताच निघालेला ३४ कट्टे गहू विक्रीस आणला. मात्र, भाव १७५० रुपये मिळाल्याने अर्धा गहू विकला. अर्ध्या गव्हाची रखवाली करावी लागत आहे. अशा स्थितीत काय कराणार शेतकरी. शेतकऱ्यांचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उचलायला हवा.

- गणेश राठोड, शेतकरी

कवळा जटेश्वर

--

शेतमालाच्या भावात चढ-उतार झाल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल राखून ठेवला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी धान्य विकले. काहींनी राखून ठेवला आहे. भाववाढीची प्रतीक्षा त्यांना लागलेली आहे.

- प्रकाश वसू,

शेतकरी, वलगाव

--

आवक कमी झाली. परंतु, दरात फारशी घट झालेली नाही. काही शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवला असून, भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी धान्य राखून ठेवले आहे.

- दीपक विजयकर,

सचिव, कृषिउत्पन्न बाजार समिती.

Web Title: In the market committee, the income of agricultural commodities decreased and the prices also declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.