बाजार समितीकडून खुलासा मागविला

By admin | Published: May 4, 2016 12:29 AM2016-05-04T00:29:54+5:302016-05-04T00:29:54+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या कारभाराची माहिती वजा खुलासा उपनिबंधकांनी मागविला आहे.

Market Committee sought disclosure | बाजार समितीकडून खुलासा मागविला

बाजार समितीकडून खुलासा मागविला

Next

डीडीआरची कारवाई : सचिवांच्या नावे पत्र
अमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या कारभाराची माहिती वजा खुलासा उपनिबंधकांनी मागविला आहे. त्यामुळे गत सहा महिन्यांत व्यवस्थापकीय संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची इत्थंभूत माहिती बाजार समिती सचिवांना पाठवावी लागणार आहे.
बाजार समितीत व्यवस्थापकीय संचालक मंडळाने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाविषयी विरोधी संचालकांनी बोट ठेवले आहे. वाहन खरेदी, कापूस गाठी सेस आकारणी, खर्चात अनियमितता, रोजंदारी मजुरांची नियुक्ती आदीे बाबी नियमबाह्य झाल्याची चर्चा बाजार समितीत जोर धरू लागली आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने बाजार समितीत सुरू असलेल्या कारभाराची बातमी प्रकाशित करून शेतकरी, संचालक, दलाल, अडत्यांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान तक्रारींचा ओघ वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हा उपनिबंधकांनी प्रकाशित बातम्यांचा आधार घेत मंगळवारी बाजार समिती सचिवांना पत्र पाठवून तत्काळ खुलासा मागविला आहे. बाजार समितीकडून खुलासा मागविल्याबाबतची सहप्रत जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी पणन संचालक आणि विभागीय सहनिबंधक सहकार यांच्याकडे पाठविली आहे. खुलासा प्राप्त होताच जिल्हा उपनिबंधक बाजार समितीचे व्यवस्थापकीय संचालक व सचिवांवर कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

काही दिवसांपासून पुणे येथे असल्यामुळे बाजार समितीत काय सुरू आहे, हे कळले नाही. मात्र सचिवांना पत्र पाठवून आतापर्यंत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबतचा खुलासा मागविला आहे. खुलासा येताच नियमानुसार कारवाई केली जाईल.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक (सहकार) अमरावती

जिल्हा उपनिबंधकांचे पत्र मिळाले नाही. बाहेर असल्यामुळे कार्यालयीन कामकाजाविषयी बोलणे संयुक्तिक नाही. पत्र मिळताच रीतसर खुलासा पाठविला जाईल.
- भूजंगराव डोईफोडे,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.

Web Title: Market Committee sought disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.