बाजार समिती कर्मचारी भरती प्रकरण अचलपूर पोलीसांकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:47+5:302020-12-25T04:11:47+5:30
परतवाडा पोलिसांनी दाखल केला होता गुन्हा परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी भरती प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये ...
परतवाडा पोलिसांनी दाखल केला होता गुन्हा
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी भरती प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये अचलपूर पोलिसांकडे चौकशीकरिता वर्ग करण्यात आले आहे.
जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशनानंतर बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांनी १७ डिसेंबरच्या तक्रारीवरून
परतवाडा पोलिसांनी प्रकरणात भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१,३४ अन्वये २१ डिसेंबरला गुन्हे दाखल केले होते. अचलपूर बाजार समितीत २०१९ मध्ये सरळसेवा नोकरभरती केली गेली. या भरतिप्रक्रियेवर आक्षेप घेत प्रशासनाकडे तक्रार दिली गेली. तक्रारीच्या अनुषंगाने अचलपूर पोलिसांनी यापूवीर्ही या प्रकरणात चौकशी केली आहे. चौकशी अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविला. या चौकशी अहवालानंतर परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल केले गेले. पण, हे प्रकरण परत परतवाडा पोलीसांकडून चौकशीकरिता अचलपूर पोलीसांकउे हस्तांतरीत करण्यात आले आहे. अचलपूर पोलीस या प्रकरणात आता गुन्हे दाखल झाल्यानंतर नव्याने चौकशी करीत आहेत.पहिल्या चौकशीदरम्यान अचलपूर पोलिसांना कम्प्यूटरचा आयपी ॲड्रेस हवा होता. ज्या कम्प्यूटरद्वारे मुदतीनंतर परीक्षा शुल्क भरले गेले त्या कॉम्प्युटरच्या आयपी ॲड्रेसची मागणी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी शाखा अचलपूरकडे पोलिसांनी केली होती. परंतु, हा आयपी ॲड्रेस पोलिसांना मिळालाच नाही. तसे त्यांनी चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे.
बॉक्स
१२५५ उमेदवारांनी दिली परिक्षा
बाजार समितीतील कर्मचारी भरतिप्रक्रियेत १६ हजार ७७५ उमेदवार पात्र ठरले होते. यातील १ हजार २५५ उमेदवारांनी परीक्षा दिली. ५२० गैरहजर होते. भरतिप्रक्रियेत ३० जुलै २०१९ पर्यंत एकूण ५ हजार ५४९ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सर्व्हरला जमा झाले होते. त्यांची यादी बाजार समितीच्या सचिवांकडे १ ऑगस्टला सादर केली गेली, तर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी बाजार समितीचे संकेत स्थळावर ८ ऑगस्ट २०१९ ला प्रसिद्ध केली गेली.
बॉक्स
सेवक उपसमिती
१८ ऑगस्ट १९ ला या पदभरतीकरिता ऑनलाइन स्पर्धा परीक्षा अमरावती येथील दोन केंद्रांवर घेतली गेली. या परीक्षा केंद्रावर निरीक्षणाकरिता अचलपूर बाजार समितीच्या सेवक उपसमितीच्या आदेशान्वये सहायक सचिव लेखापाल पोहोचले हाेते.
बॉक्स
चुकीची प्रक्रिया
तत्कालीन प्रभारी जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी, अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवलेल्या आपल्या ३१ ऑक्टोबर २०१९ च्या पत्रात लता वाजपेयी यांंच्याबाबत के.एन.के. टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे या कंपनीने चुकीची प्रक्रिया राबविल्याचे स्पष्ट केले आहे. लता वाजपेयी यांची नियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही दिले. पालेकर यांच्या पत्रान्वये ती नियुक्त बाजार समितीने रद्द केली नाही. ही नियुक्ती रद्द केली असती, तर आज बाजार समितीला पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले नसते.