बाजार समिती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:30+5:302021-05-24T04:12:30+5:30
मोर्शी : येथील कृषिउत्पन्न बाजार समिती २१ मेपासून पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात वाढत्या ...
मोर्शी : येथील कृषिउत्पन्न बाजार समिती २१ मेपासून पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ५ मे ते २१ मे या कालावधीकरिता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘चेंज द ब्रेक’ अंतर्गत ३१ मेपर्यंत टाळेबंदी घोषित केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषिउत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. यामुळे रबी हंगामातील शेतमाल शेतकऱ्यांचा घरी पडून होता. खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांजवळ त्याकरिता पैसे नसल्यामुळे बाजार समित्या तातडीने सुरू करण्यात याव्या, ही शेतकऱ्यांची मागणी होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १९ मे रोजी परिपत्रक काढले. कोविड नियमांचे पालन करून २१ मेपासून कृषिउत्पन्न बाजार समित्या सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बाजार समितीत धान्य व भाजीपाला आणि फळे, मिरची आणण्यापूर्वी टोकण घेऊन हा माल वेळेवर मार्केट यार्डवर खरेदी विक्रीसाठी आणावा, असे आवाहन मोर्शी कृषिउत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून कृषिउत्पन्न बाजार समिती येथे प्रवेश घेताना मास्क लावून आत यावे. फिजिकल डिस्टन्स ठेवून व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकावा. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे कृषिउत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.