बाजार समितीत सुरक्षा रक्षकांच्या निविदा ‘मॅनेज’ !

By admin | Published: March 7, 2016 12:02 AM2016-03-07T00:02:17+5:302016-03-07T00:02:17+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात कंत्राट प्रक्रिया राबविण्यासाठी निविदा ‘मॅनेज’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Market Committee's security guards 'tender' management! | बाजार समितीत सुरक्षा रक्षकांच्या निविदा ‘मॅनेज’ !

बाजार समितीत सुरक्षा रक्षकांच्या निविदा ‘मॅनेज’ !

Next

छोट्या वृत्तपत्रात जाहिरात : सव्वा कोटींचे कंत्राट तरीही ई-निविदा का नाही ?
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात कंत्राट प्रक्रिया राबविण्यासाठी निविदा ‘मॅनेज’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्षाकाठी सव्वा कोटी रुपयांचे सुरक्षा रक्षकांचे कंत्राट असताना ई-निविदा प्रक्रिया का राबविली जात नाही?, याविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. छोट्या वृत्तपत्रात निविदेची जाहिरात देऊन प्रशासनाला काय साध्य करायचे आहे?, यासंदर्भात बाजार समितीत चर्चांना उधाण आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षकांचे कंत्राट जानेवारी महिन्यात संपुष्टात आले आहे. त्यामुळे नव्याने सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविण्याचे धोरण आखले आहे. मात्र, ही प्रक्रिया ई-निविदा पध्दतीने करण्यात आली नाही. काही संचालकांच्या मर्जीतील संस्थांना सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट देण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यामुळे ई-निविदेची अट देखील शिथिल करण्याचा डाव रचण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकाची निविदा प्रसिध्द करताना ती छोट्या वृत्तपत्रात देण्यात आली आहे.

Web Title: Market Committee's security guards 'tender' management!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.