तुरीसाठी ‘बाजार हस्तक्षेप’ योजना

By admin | Published: May 30, 2017 12:03 AM2017-05-30T00:03:50+5:302017-05-30T00:03:50+5:30

केंद्र शासनाने नाफेडव्दारा सुरू असलेली तूर खरेदी २६ मेपासून बंद केल्याने आता राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत उर्वरित तूर खरेदी करण्यात येत आहे.

'Market Intervention' Scheme for Ubi | तुरीसाठी ‘बाजार हस्तक्षेप’ योजना

तुरीसाठी ‘बाजार हस्तक्षेप’ योजना

Next

नाफेडचे हात वर : अद्याप चार लाख क्विंटल तूर मोजणी बाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाने नाफेडव्दारा सुरू असलेली तूर खरेदी २६ मेपासून बंद केल्याने आता राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत उर्वरित तूर खरेदी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत यार्डात चार लाख तीन हजार ५७९ क्विंटल तूर मोजणी बाकी आहे. डीएमओव्दारा शनिवारी १५ हजार २८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
जिल्ह्यासह राज्यात १० मेपासून नाफेडच्यावतीने पीएसएस योजनेंतर्गत तुरीची खरेदी सुरू करण्यात आली. मात्र, एक लाख क्ंिवटल खरेदीची अट ठेवण्यात आली होती. ही मर्यादा संपल्याने केंद्राने तूर खरेदी बंद केली. मात्र हजारो क्ंिवटल तूर बाजार समित्यांमध्ये पडून असल्याने शासनाचेवतीने पूर्वीचीच ‘बाजार हस्तक्षेप’ योजना शनिवारपासून सुरू करण्यात आली. १० मेपासून ‘पीएसएस’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ केंद्रांमधील १० हजार १११ शेतकऱ्यांची एक लाख ८५ हजार ३३१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर येथे १,२२७ शेतकऱ्यांची २५,४१५ क्विंटल, अमरावती येथे ७२० शेतकऱ्यांची १९,३४० क्विंटल, अंजनगाव सुर्जी येथे १,०८० शेतकऱ्यांची १८,६६२ क्विंटल,

डीएमओद्वारे खरेदी
अमरावती : चांदूरबाजार येथे १,०५८ शेतकऱ्यांची २०,०२० क्विंटल, चांदूररेल्वे येथे ७१३ शेतकऱ्यांची ११,४५० क्विंटल, दर्यापूर येथे ६०८ शेतकऱ्यांची १४,००८ क्विंटल, धामणगाव येथे १,८५९ शेतकऱ्यांची २७,९५८ क्विंटल, मोर्शी येथे ६४३ शेतकऱ्यांची ११,२११ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर येथे ५९२ शेतकऱ्यांची १२,१५३ क्ंिवटल, तिवसा तेथे २६० शेतकऱ्यांची ३,७५० क्विंटल तर वरूड केंद्रावर १,३५१ शेतकऱ्यांची २१,३६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.
‘बाजार हस्तक्षेप’ योजनेच्या पहिल्याच दिवशी ८६५ शेतकऱ्यांची १५,२८० क्चिंटल तूर डीएमओव्दारा खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये अचलपूरला २,४२५ क्विंटल, अमरावती १,१६३, अंजनगाव सुर्जी १,७१६, चांदूरबाजार १,६४९, चांदूररेल्वे १,०६५, दयारपूर १,८०७, धामणगाव १,५४८, धारणी १७३, मोर्शी १,१८५, नांदगाव खंडेश्वर ५१४, तिवसा ८९, व वरुड केंद्रावर ९४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

१८ हजार शेतकऱ्यांची तूर मोजणी बाकी
नाफेडद्वारा १० मे रोजी ‘पीएसएस’ योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून आवक झालेल्या तुरीपैकी १७,७६६ शेतकऱ्यांची चार लाख तीन हजार ५७९ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर १,७४८ शेतकऱ्यांची ३७,७५७ क्विंटल, अमरावती ३,५३९ शेतकऱ्यांची ९९,६१९, अंजनगाव १,८८५ शेतकऱ्यांची ३१,८९०, चांदूरबाजार १,२०२ शेतकऱ्यांची २७,६२७, चांदूररेल्वे ८३९ शेतकऱ्यांची १९,१८६, दर्यापूर २,६५९ शेतकऱ्यांची ७३,७२०, धामणगाव ४०८ शेतकऱ्यांची १२,३९३, धारणी येथे ३८ शेतकऱ्यांची ८८२, मोर्शी १,६२४ शेतकऱ्यांची ३१,०६७, नांदगाव खंडेश्वर १,९२५ शेतकऱ्यांची ३४,८८७, तिवसा ८०४ शेतकऱ्यांची ११,६६१ व वरूड केंद्रावर १,०९५ शेतकऱ्यांची २२,९९६ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.

Web Title: 'Market Intervention' Scheme for Ubi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.