मांजरखेङ कसबा येथे स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाचा बाजारहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:37+5:302021-07-19T04:10:37+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत स्थापित स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाच्या माध्यमातून चांदूर रेल्वे पंचायत समितीअंतर्गत मांजरखेड कसबा येथे ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत स्थापित स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाच्या माध्यमातून चांदूर रेल्वे पंचायत समितीअंतर्गत मांजरखेड कसबा येथे बाजारहाटाचे उद्घाटन अमरावती येथील जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख व मांजरखेड येथील सरपंच दिलीप गुल्हाने, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच किरणताई देशमुख, तालुका व्यवस्थापक सविता थेटे, अमित ढवळे, प्रभाग समन्वयक रेखा खेडकर, ग्रामसेवक इगळे, पत्रकार राहुल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे यांचे बचत गटांच्या महिलांनी स्वागत केले. शुक्रवार 16 जुलै रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मांजरखेड ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मांजरखेड गावातील मंगळवार व शुक्रवार या दिवशी हाताने तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्द राहणार आहेत, या उद्देशाने गावातील बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळेस महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा व्यवस्थापक अमरावती यांनी सांगितले की, आपण चांगल्या प्रकारे मोगऱ्याची झाडे सर्वच बचत गटांना देणार असून, महिलांनी घरोघरी मातीच्या कुंडीत किंवा जमिनीवर लावून त्याचे संगोपन करावे. त्याची फुले तोडून बाजारात उपलब्ध करावीत. मांजरखेड कसबा येथील सरपंच दिलीप गुल्हाने यांनी गावातील पाणीपट्टी व करवसुलीकरिता बचत गटांनी प्रयत्न केले तर त्यातूनच भव्यदिव्य असे ग्रामपंचायतमार्फत ग्रामसंघ कार्यालय बांधून देईल, असे आश्वासन सरपंच दिलीप गुल्हाने यांनी दिले. महाराष्ट्र शासनांतर्गत ग्रामीण भागात स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाच्या बाजारहाटाचे उद्घाटन बाजार चौकात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मांजरखेड येथील कार्यक्रमाचे संचालन प्रणिता राहुल देशमुख यांनी करून आभार मानले. यावेळी उज्ज्वला भास्कर ढगे, जया संजय देशमुख, आर्थिक साक्षरता सखी स्वाती संदीप देशमुख, ग्रामसंघ अध्यक्ष रेखा गजानन गवई, संगीता सूर्यवंशी, भारती देशमुख, दर्शना देशमुख, माया शिरभाते, शारदा खोडके, रेखा तामखाने, किरण जयस्वाल, राणी तसरे आदी बचत गटातील महिलांची उपस्थिती होती.
: मांजरखेड कसबा येथील महिला बचत गटाच्या बाजारहाटाचे उद्घाटन करताना सचिन देशमुख, सरपंच दिलीप गुल्हाने, ग्रामसेवक इगळे, पत्रकार राहुल देशमुख.
180721\1620-img-20210718-wa0022.jpg
photo