पणनचा फतवा, उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:15 PM2018-03-09T23:15:05+5:302018-03-09T23:15:05+5:30
खासगीत हमीपेक्षा कमी भाव असल्याने पणन विभागाद्वारा एक मार्चपासून खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना आहेत. यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झालीे, मात्र नऊपैकी एकाही केंद्रावर अद्याप खरेदी सुरू झालेली नाही.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : खासगीत हमीपेक्षा कमी भाव असल्याने पणन विभागाद्वारा एक मार्चपासून खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना आहेत. यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झालीे, मात्र नऊपैकी एकाही केंद्रावर अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच जिल्ह्यात एकूण उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदी करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले आहेत. त्यामुळे शासन खरेदीच्या नावावर पुन्हा एकदा शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होणार असल्याचे वास्तव आहे.
यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीत आर्द्रता वाढली होती. परिणामी सरासरीक्षेत्रापेक्षा अधिक ११२ टक्के म्हणजेच एक लाख चार हजार हेक्टरमध्ये हरभरा आहे. सध्या हरभºयाच्या सवंगणी व मळणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र नाफेडची खरेदी केंद्र सुरू झाली नसल्याने अडचणीतील शेतकरी मिळेल त्या भावात हरभºयाची विक्री करीत आहे.
वास्तविकता केंद्र शासनाचे कृषी मंत्रालयाद्वारा जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना २३ फेब्रुवारीच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात एक मार्चपासून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना आहेत. ही खरेदी २९ मे २०१८ पर्यत राहणार आहे.
केंद्राने निश्चित केलेली आधारभूत किंमत ४,४०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येणार असली तरी जिल्ह्यात डीएमओंद्वारा ३ मार्चला नऊ केंद्रांना आॅनलाईन नोंदणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३३३ शेतकºयांनी अॉनलाइन नोंदणी केली, यामध्ये सर्वाधिक शेतकरी दर्यापूर तालुक्यातील असल्याचे स्पष्ट होत आहे.
हेक्टरी १२ क्विंटल खरेदीची मर्यादा
कृषी विभागाद्वारा १२ क्विंटल हेक्टरी उत्पादकता सूचविल्याप्रमाणेच ही खरेदी करण्यात येणार आहे. संबंधित शेतकºयांचे सात-बाऱ्यावरील क्षेत्र व उत्पादकता याची सांगड घालून खरेदी करावी, अशा पणन विभागाच्या सूचना आहेत. आॅनलाइन पद्धतीनेच हरभºयाची खरेदी करण्यात येणार आहे. व खरेदीपूर्व शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे.
२९ मेपर्यंत राहणार खरेदी
निश्चित केलेल्या उत्पादकतेनुसार जिल्ह्यात एकूण होणाऱ्या हरभरा उत्पादनाच्या केवळ २५ टक्के प्रमाणातच खरेदी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. ही खरेदी २९ मे २०१८ पर्यंत सुरू राहणार आहेत किंवा केंद्र शासनाने खरेदीकरिता दिलेले उदिष्टपूर्ती होईपर्यंत ही खरेदी सुरू राहणार असल्याचे पणन विभागाने कळविले आहे.
९,६४४ शेतकऱ्यांची १.४३ लाख क्विंटल तूर खरेदी
सद्यस्थितीत ९,६४४ शेतकऱ्यांची १,४३,७०२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत ३२,८६४ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. हरभऱ्यासाठी ३३३ शेतकºयांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक १२८ शेतकऱ्यांची नोंदणी दर्यापूर केंद्रावर झालेली आहे. तसेच व्हीसीएमएफच्या तीन केंद्रांवर १०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी ९७ शेतकऱ्यांची नोंदणी धामणगाव केंद्रावर झालेली आहे.
जिल्ह्यातील नऊही केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व खरेदीच्या सूचना तीन मार्चला देण्यात आल्या आहेत. सध्या ३३३ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. लवकरच केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी सुरू होईल.
- रमेश पाटील,
जिल्हा विपणन अधिकारी