२२ मे रोजी मंगळ, सूर्य पृथ्वीच्या आमने-सामने

By admin | Published: May 4, 2016 12:40 AM2016-05-04T00:40:35+5:302016-05-04T00:40:35+5:30

२२ मे रोजी सूर्यमालेतील लाल ग्रह मंगळ व सूर्य पृथ्वीच्या दृष्टीने समोरासमोर राहणार आहेत.

Mars on May 22, face-to-face with Sun Earth | २२ मे रोजी मंगळ, सूर्य पृथ्वीच्या आमने-सामने

२२ मे रोजी मंगळ, सूर्य पृथ्वीच्या आमने-सामने

Next

खगोलीय घटना : मंगळ ग्रहाची पौर्णिमा अनुभवता येणार
अमरावती : २२ मे रोजी सूर्यमालेतील लाल ग्रह मंगळ व सूर्य पृथ्वीच्या दृष्टीने समोरासमोर राहणार आहेत. त्यामुळे यादिवशी हा ग्रह जास्तीत जास्त प्रकाशित राहील. परिणामत: पृथ्वीवासीयांना मंगळ ग्रहाची पोर्णिमा अनुभवता येणार आहे. त्यामुळे यादिवशी खगोल अभ्यासक व सामान्य जनतेला याचे निरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे.
मंगळ ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर असल्यामुळे त्याच्या परिभ्रमणाची कक्षा जास्त विस्तारित आहे. त्यामुळे त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ७८६.८९ दिवस म्हणजेच सुमारे २३ महिने लागतात. म्हणजेच मंगळाचे वर्ष हे पृथ्वीपेक्षा १.८८ पटीने अधिक आहे. सरासरी सूर्याभोवती पृथ्वीच्या दोन फेऱ्या होतात. तेव्हा मंगळाची एक फेरी पूर्ण होते. दोन्ही ग्रह गतिमान असल्यामुळे दर २६ महिन्यांनी सूर्य पृथ्वी व मंगळ एका सरळ रेषेत आल्यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्राच्या पूर्ण भागावर पडतो, त्याचप्रमाणे सूर्य, पृथ्वी व मंगळ एका सरळ रेषेत आल्यामुळे पौर्णिमा होते. सूर्य पृथ्वी व एखादा ग्रह सरळ रेषेत आल्यास त्याला युती असेसुध्दा म्हणतात. हीच स्थिती २२ रोजी येणार असून या दिवशी मंगळाचे पृथ्वीपासूनचे किमान अंतर हे ०.५०९ खगोलीय एककक म्हणजेच ७ कोटी ६१ लक्ष ९२ हजार कि़मी इतके राहील. या दिवशी चंद्र वगळता आकाशात सर्वात जास्त तेजस्वी पिंड हा मंगळ असेल. त्यामुळे खगोल अभ्यासकांना यादिवशी मंगळाचे निरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे. प्रभावी दुर्बिणीने त्याचा पृष्ठभाग व ध्रूव प्रदेशावरील बर्फाची टोपी सहज पाहता येते. साधारण दुर्बिणीनेही त्याचा गोल आकार व त्यावरील दऱ्यांचा काळसर पटटा पाहता येतो. इतर वेळेस मंगळ ग्रह दुर्बिणीने ताऱ्यासारखा चमकदार दिसता. बरेचदा अशावेळी आकाशात चंद्र जर नसेल तर ग्रामीण भागातून मंगळवार चांदणेही अनुभवता येतो. सध्या मंगळ वृश्चिक राशीत असून ज्येष्ठा ताऱ्याच्या डावीकडे तो रात्री ८.०० वाजता पूर्वेस सहज पाहता येतो. यापूर्वी मंगळाची युती ८ एप्रिल २०१४ रोजी झाली होती. तर यानंतर ही स्थिती २७ जूलै २०१८, १३ आॅक्टोबर २०२० व ८ डिसेंबर २०२२ या तारखाना पुन्हा येईल, असे मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे, प्रवीण गुल्हाने, रोहित कोठाडे, भूषण ब्राह्मणे व पंकज गोपतवार यांनी केले आहे.

Web Title: Mars on May 22, face-to-face with Sun Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.