श्री क्षेत्र जहागीरपूर येथे मारुतीरायांचा जयजयकार
By Admin | Published: April 2, 2015 12:39 AM2015-04-02T00:39:33+5:302015-04-02T00:39:33+5:30
विश्वविख्यात श्री महारुद्र मारुतीचे शक्तिस्थळ व प्रेरणास्थळाच्या नावारुपाने करोडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र जहागीरपूरच्या ..
अमरावती : विश्वविख्यात श्री महारुद्र मारुतीचे शक्तिस्थळ व प्रेरणास्थळाच्या नावारुपाने करोडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र जहागीरपूरच्या श्री महारुद्र मारुतीच्या दर्शनार्थ श्रीहनुमान जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या विभिन्न आयोजनात लाखो भाविक हजर होऊन श्री महारुद्र मारुतींचे दर्शन घेऊन धन्य होणार आहेत.
रामनवमीपासून संत माताजी शारदा देवी चांडक यांच्या ओजस्वी वाणीत संगीतमय सजीव देखाव्यासह श्रीमद् भागवतकथेचे आयोजन हजारो भाविकांच्या उपस्थितीत दररोज दुपारी २ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपावेतो ‘अयोध्याधाम’ भक्त निवासात सुरु झालेले आहे. कथा ऐकण्यास येणाऱ्या सर्व भाविकांना भोजन प्रसादाचा लाभही देण्यात येत आहे. सर्व भाविकांना आजूबाजूच्या खेड्या व शहरातून आणण्यासाठी व नेण्यासाठी संस्थानतर्फे तीन लक्झरी बसेसची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर श्री महारुद्र हनुमंताच्या जयजयकाराने दररोज दुमदुमत आहे.
श्रीमती भागवत कथेत प.प.ू माताजी शारदादेवी चांडक, आर्वी यांच्या अमृतवाणीत, सजीव देखाव्याच्या सुंदर दृश्याला साकार करणारे सर्व कलावंत, सुमधूर लयबध्द भजनांना श्रवणीय संगीताच्या साथीने प्रस्तूत करणाऱ्या सर्व संगीतकार चमूमुळे श्रोते मंत्रमुग्ध होतात. श्रीक्षेत्र जहागीरपूरला मोठ्या श्रध्देने आपल्या हृदयात स्थानापन्न केलेले आहे. कथा ३ एप्रिल २०१५ रोजी समाप्त होणार आहे. समापन श्री हनुमान जयंतीच्या दिवशी ४ एप्रिल २०१५ रोजी सकाळी १० वाजता संत श्रीरामराम महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
श्री हनुमान जयंती ४ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता रामकुंवरजी मोतीलाल अग्रवाल स्मृतिद्वाराचे उद्घाटन संत श्री रामराम महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
भाविकांसाठी विशेष बसची व्यवस्था
श्री हनुमान जयंती व येणारे सर्व चैत्र शनिवार रोजी श्री क्षेत्र जहागीरपुरला येण्यासाठी विभिन्न बस स्थानकावरुन भाविकांच्या संख्येनुसार यात्रा स्पशेल बसेस भविकांच्या विनंतीनुसार सोडण्यात येणार आहे.
महापदयात्रेचे आयोजन
सम्राट ह.भ.पं. श्री लक्ष्मणदास काळे महाराज, आमला विश्वेश्वर हे ‘दहिहांडी’ व काल्याचे कीर्तन सादर करतील. संध्याकाळी ५ वाजता दहीहांडी चा कार्यक्रम होईल अशी माहिती ओमप्रकाश परतानी यांनी प्रसिध्दी पत्रकामार्फत दिली. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अमरावती-धामणगांव रेल्वे येथून शुक्रवार दि. ३ एप्रिल २०१५ रोजी रात्री निघुन शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी शेकडो भक्त महापदयात्रेने श्री क्षेत्र जहागीरपुरला येणार आहे. त्यांचे स्वागत सत्कार संस्थानतर्फे हनुमानजयंतीला करण्यात येणार असल्याचे महारुद्र संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.