प्रवाशांच्या तोंडावर मास्क; मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:30+5:302021-06-24T04:10:30+5:30

अमरावती : दीड महिन्याच्या अवकाशानंतर एसटी बसेस सुरू झाल्या. प्रवाशांचीही हूळूहळू बसमध्ये गर्दी वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

Masks on passengers' faces; But where is the physical distance? | प्रवाशांच्या तोंडावर मास्क; मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा कुठे?

प्रवाशांच्या तोंडावर मास्क; मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा कुठे?

Next

अमरावती : दीड महिन्याच्या अवकाशानंतर एसटी बसेस सुरू झाल्या. प्रवाशांचीही हूळूहळू बसमध्ये गर्दी वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र, प्रवास करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचा प्रवाशांना विसर पडल्याचे चित्र लोकमतने रिॲलिटी चेक दरम्यान दिसून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आणि लॉकडाऊन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले. या कालावधीत सलग ४५ दिवस एसटी बसेसची प्रवासी वाहतूक बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर आता शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे एसटी बसेस पूर्ण क्षमतेने धावत आहेत. एसटी बसेसची थांबलेली चाके रुळावर आली आहे. बुधवारी लोकमतने अमरावती - परतवाडा बसने प्रवास केला. या दरम्यान ४० प्रवासी बसले होते. यातील प्रवाशांच्या तोंडावर मास्क लावलेला दिसून आला. मात्र, फिजिकल्स डिस्टन्सिंगचा सूचनेची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.

बॉक्स

सव्वा तासाच्या प्रवासात कितीवेळा तोंडावर मास्क?

चालक - अमरावती ते परतवाडा या सव्वा तासाच्या प्रवासात चालकांच्या तोंडावर १५ मिनिट मास्क कायम होता. चार ते पाच वेळाच चालकांने तोंडावरील मास्क बाजूला केला.

वाहक -अमरावती ते परतवाडा या सव्वा तासाच्या प्रवासात चालकांच्या तोंडावर तासभर मास्क कायम होता. केवळ बस थांब्यावर एक दाेन वेळा मास्क हनुवटीवर ओढला जातो.

प्रवासी- बहुतांश प्रवासी मास्क तोंडावरून बाजूला करताना दिसून आले. सामाजिक अंतर राखणे गरजेचे असताना एका सिटवर दोन प्रवासी, तर एक दोन सिटवर तीन प्रवासी बसले होते. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

बॉक्स

कुठल्या ठिकाणाहून किती प्रवासी चढले अन् किती उतरले?

गाडगेनगर

अमरावती बसस्थानकाहून २० प्रवासी बसले होते. या प्रवासात पुरुषांची संख्या अधिक होती. यात पहिल्या थांब्यावर गाडगेनगर येथे दोन प्रवासी बसमध्ये बसले.

कठोरा नाका

गाडगेनगर येथून बस सुटल्यानंतर पुढे १५ मिनिटांनी कठोरा नाका येथून ३ प्रवासी बसले.या प्रवाशांचा तोंडाला बस मध्ये बसतांना मास्क होता. मात्र वलगाव जवळ बस पोहोचताच मास्क तोंडावर हनुवटीवर आणून गप्पांचा फड रंगला.

आसेगाव पूर्णा

कठोरा नाक्यावरून सुटल्यानंतर ही अर्ध्या तासाने आसेगाव पूर्णा येथे पोहोचली. तेथे चार प्रवासी उतरले आणि एक प्रवासी बसमध्ये चढला. आतील प्रवासी उतरल्यानंतर प्रवाशांनी मात्र तोंडावरील मास्क काढल्याचे दिसून आले.

मिल कॉलनी स्टॉप

आसेगाव पूर्णा येथील प्रवासी थांबल्यावरून सुटलेली एसटी बस तासाभराने परतवाडा येथील मिल स्टॉपवर बस थांबली. या ठिकाणी पाच प्रवासी उतरले. दोन प्रवासी तोंडावरील मास्क काढून थांब्यावर उतरले.

बॉक्स

लोकमतचा एसटी प्रवास

बस- अमरावती ते परतवाडा

वेळ - सकाळी ९.३० वाजता

प्रवासी-४०

Web Title: Masks on passengers' faces; But where is the physical distance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.