CAA Protest : अमरावतीत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात विशाल मोर्चा, जिल्हा कचेरीवर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 07:15 PM2019-12-30T19:15:33+5:302019-12-30T19:16:30+5:30
Citizen Amendment Act : वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व विविध मुस्लिम संघटनांनी सीएए आणि एनआरसीला सोमवारी अमरावतीत एकत्रितपणे विरोध दर्शविला.
अमरावती : केंद्र सरकारने मंजूर केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय जनसंख्या नोंदणी (एनपीआर) या कायद्याविरोधात सोमवारी अमरावती शहरात मुस्लिम बांधवांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील मुस्लिम बांधवांसह अनुसूचित जाती, मराठा समाजबांधवांचीसुद्धा उपस्थिती होती. विविध मुस्लिम संघटनांसह वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी आदी सामाजिक, राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चात सहभाग होता. वलगाव मार्गालगतच्या डिप्टी ग्राऊंड ते जिल्हा कचेरी दरम्यान निघालेल्या मोर्चातील गर्दी लक्षणीय ठरली.
केंद्र शासनाने संमत केलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएबी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व विविध मुस्लिम संघटनांनी सोमवारी अमरावतीत एकत्रितपणे विरोध दर्शविला. वलगाव रोडवरील डिप्टी ग्राऊंड येथे सभेनंतर मोर्चाला प्रारंभ झाला. राष्ट्रपतींकरिता मोर्चेकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. मोर्चाचे एक टोक जिल्हाधिकारी कार्यालयानजीक तर दुसरे इर्विन चौकात असे त्याचे स्वरूप होते.