पोलिंग पार्टींना थेट मतदान केंद्रावर साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:19+5:302021-01-14T04:12:19+5:30

(अर्धा कॉलम फोटो) अमरावती : कोरोना काळातील ग्रामपंचायत निवडणुकांना एक आव्हान समजून आवश्यक खबरदारी घेत भातकुलीच्या तहसीलदार नीता ...

Materials to polling parties directly at the polling station | पोलिंग पार्टींना थेट मतदान केंद्रावर साहित्य

पोलिंग पार्टींना थेट मतदान केंद्रावर साहित्य

Next

(अर्धा कॉलम फोटो)

अमरावती : कोरोना काळातील ग्रामपंचायत निवडणुकांना एक आव्हान समजून आवश्यक खबरदारी घेत भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांनी जिल्ह्यात पहिल्यांदा एक अभिनव संकल्पना रावबिली. यात पोलिंग पार्टी तहसील कायार्लयात न येता गुरुवारी सकाळी १० पर्यंत त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचतील व तेथेच झोनल अधिकाऱ्यांमार्फत त्यांना मतदान साहित्य मिळणार आहे.

भातकुली तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यात १२२ मतदान केंद्रांवर ६७,९५२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. १५ जानेवारीला मतदान असल्याने १४ ला पोलिंग पार्टी रवाना होतील. यावेळी त्या तहसील कार्यालयात न येता थेट मतदान केंद्रांवर पोहोचतील, मंगळवारी प्रशिक्षण दरम्यान संबंधित झोनल अधिकारी व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिंग पार्ट्यांची ओळख करून देण्यात आली. त्यांनी एक व्हॉटस ॲप ग्रुप बनविला व त्याद्वारे सर्व एकमेकांच्या संपर्कात राहणार आहे. याशिवाय पोलीस कर्मचारी हे थेट केंद्रावर न जाता तहसीलमध्ये येऊन ईव्हीएम असणाऱ्या झोनल अधिकाऱ्यांच्या वाहनात त्यांना नेमून दिलेल्या केंद्रात जातील व परतीत झोनल अधिकाऱ्यांद्वारा मतदान साहित्य मिळाल्याचे व मॉकपोल झाल्याचे पत्र घेणार आहे. या तालुक्यात किमान ८०० मनुष्यबळ राहणार आहे. यामध्ये गर्दी टाळण्यासोबत खर्चाचीही बचत होणार असल्याचे लबडे यांनी सांगितले.

बॉक्स

सातऐवजी १६ झोनल अधिकारी

या प्रक्रियेत झोनल अधिकारी वाढविण्यात आले. त्यांच्यामार्फत मतदान प्रक्रिया झाल्यावर प्रिसिडींग डायरी, मतांच्या हिशोबाचे पत्र, सीयू, आदी घेतल्या जातील. पोलीसदेखील त्याच वाहनात राहणार आहे. पार्ट्यांना सॅनिटायझर, डिस्पोझल मास्क आदी साहित्य देण्यात आलेले आहे. या प्रक्रियेसाठी तीन व्हॉलमध्ये प्रत्येकी ४० कर्मचाऱ्यांचे तीन सत्रात प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.

कोट

प्रशिक्षण दरम्यान सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना याविषयीची माहिती दिली, त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये गर्दी टाळण्यात येऊन कमी वेळात अन् कमी खर्चात जलद कामे होतील.

- नीता लबडे, तहसीलदार

Web Title: Materials to polling parties directly at the polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.