मे हीट, अमरावती ४४.७; घरीच रहा, सुरक्षित राहा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 14, 2023 05:41 PM2023-05-14T17:41:25+5:302023-05-14T17:41:38+5:30
तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झालेली आहे. रविवारी दुपारी ३ वाजता येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या तापमापक यंत्रावर ४४.७ ...
तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झालेली आहे. रविवारी दुपारी ३ वाजता येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या तापमापक यंत्रावर ४४.७ अंश तापमानाची नोंद झालेली आहे. सावलीत असतानाही अंगाची काहिली अन् घामाच्या धारा लागल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुपारी १२ नंतर रस्ते ओस पडल्याचे दिसून आले.
जिल्ह्यास मे हीटचा तडाखा बसला आहे. या प्रचंड तापमानात नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो दुपारी १२ ते ४ या काळात घराबाहेर निघणे टाळा, शारीरिक कष्टाची कामे या काळात करू नका, घराबाहेर पडताना पांढरे, सैल सुती कपडे घालावे, भरपूर पाणी प्यावे, शक्य असल्यास डोळ्याला काळा गॉगल लावावा. नारळ पाणी, लिंबू पाणी, पन्हं याचे सेवन करावे, तेलकट पदार्थ खाऊ नये, असे आरोग्य विभागाने सांगितले.