मराठी नववर्ष सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:00 AM2022-04-03T05:00:00+5:302022-04-03T05:00:55+5:30
गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत दोन वर्षे अनेकविध उपाययोजना राबविण्यात आल्या. दोन वर्षांच्या या लढाईनंतर आज पाडव्याचा सण कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. अमरावती जिल्ह्यात निर्बंध दूर सारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मराठी नववर्ष व गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. कोरोना रुग्णांमध्ये व पॉझिटिव्हिटी दरात लक्षणीय घट झाल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. हे नववर्ष सर्वांना निरामय आरोग्य, सुखसमृद्धी देवो, अशा शब्दांत महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत दोन वर्षे अनेकविध उपाययोजना राबविण्यात आल्या. दोन वर्षांच्या या लढाईनंतर आज पाडव्याचा सण कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. अमरावती जिल्ह्यात निर्बंध दूर सारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले. पुन्हा अशी साथ उद्भवू नये. सर्वांना उत्तम आरोग्य व सुखसमृद्धी लाभो, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी दिल्या.
शहर कॉंग्रेसने उभारली सामाजिक एकतेची गुढी
शहर काँग्रेसद्वारा पालकमंत्री यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, बबलू शेखावत, विलास इंगोले आदींच्या उपस्थितीत शनिवारी येथील राजकमल चौकात सामाजिक एकतेची गुढी उभारण्यात आली. यावेळी ५० ढोलवादकांच्या पथकाने वातावरणात जोश तयार झाला. महिला पदाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी फुगडीचा फेर घेतला. कोमल बोथरा, संजय वाघ, बाळासाहेब भुयार, मुन्ना राठोड, सुनील पडोळे, विजय वानखडे, जयश्री वानखडे, गजानन जाधव, राजाभाऊ चौधरी, अभिनंदन पेंढारी, गजानन राजगुरे उपस्थित होते.