तिवसा ग्रामीण रुग्णालयातील औषधीसाठा जाळला

By admin | Published: August 26, 2016 12:18 AM2016-08-26T00:18:54+5:302016-08-26T00:18:54+5:30

ग्रामीण रुग्णालय परिसरात अडगळीच्या ठिकाणी मंगळवारी औषधी साठा जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Medical facilities of Tivasa rural hospital were burnt | तिवसा ग्रामीण रुग्णालयातील औषधीसाठा जाळला

तिवसा ग्रामीण रुग्णालयातील औषधीसाठा जाळला

Next

डेस्ट्रॉय पद्धतीबाबत संभ्रम : नेमके कारण काय?,चर्चांना ऊत
तिवसा : ग्रामीण रुग्णालय परिसरात अडगळीच्या ठिकाणी मंगळवारी औषधी साठा जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात औषधी मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच रुग्णाकडून ऐकायला मिळतात. मात्र रुग्णालयाच्या निवासी क्वॉर्टरमागे एका लहानशा बोळीमध्ये अनेक औषधांची पाकिटे, इंजेक्शन जाळले गेले असून जाळलेल्या औषधी मुदतबाह्य होत्या की, काही घबाड लपविण्याकरिता त्या जाळल्या. याबाबत संश्य व्यक्त केला जात आहे. औषधी वितरण प्रणाली राबविताना किंवा कालबाह्य औषधी ड्रेस्टॉय करताना याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे रीतसर पत्रव्यवहार केला जातो. परंतु मागील एक-दोन महिन्यांत तरी याबाबत प्रक्रिया राबविली गेली नाही. स्थानिक पातळीवरसुद्धा याबाबत कार्यवाही नाही. मग हा औषधीसाठा का जाळण्यात आला, हे गुलदस्त्यात आहे. जाळलेल्या औषधी कुणी व कुणाच्या परवानगीने जाळल्या गेल्यात, याचा तपास होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Medical facilities of Tivasa rural hospital were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.