तिवसा पंचायत समिती येथे सरपंच समितीची सभा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:27+5:302021-09-04T04:17:27+5:30
शेंदोळा खुर्द : ग्रामपंचायतीवर नियंत्रण, तसेच विविध विकास योजनांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधे दुरुस्ती ...
शेंदोळा खुर्द : ग्रामपंचायतीवर नियंत्रण, तसेच विविध विकास योजनांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याने
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधे दुरुस्ती करून सरपंच समितीची तरतूद 1975 साली करण्यात आली. यानुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सरपंच समिती स्थापन करण्यात येते. यात तालुक्यातील 15 किंवा एक पंचमांश सरपंच कार्यरत असून, पंचायत समिती उपसभापती हे पदसिद्ध अध्यक्ष व विस्तार अधिकारी पंचायत पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतात.
2 सप्टेंबर रोजी पंचायत समिती तिवसा येथे उपसभापती श्री शरद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यात सरपंच समितीसमवेत इतर सरपंच, उपसरपंचही उपस्थित होते.
पंचायत समिती स्तरावरील रोजगार हमी योजना, घरकुल योजना, उमेद अभियान, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम विभागातील योजनांची सद्य:स्थितीची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी सरपंचांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांनी उत्तरे दिली. अशा पद्धतीची सरपंच समिती सभा घेणारी तिवसा पंचायत समिती जिल्ह्यात पहिली आहे, असे सभेचे अध्यक्ष शरद वानखेडे यांनी सांगितले. सभापती सौ. शिल्पाताई रवींद्र हांडे यांनीदेखील उपस्थित राहून ग्रामपंचायतच्या समस्या जाणून घेतल्या.
030921\1521-img-20210903-wa0002.jpg
सरपंच समितीच्या सभेला मार्गदर्शन करतांनी शरद वानखडे उपसभापती पं स तिवसा व डॉ चेतन जाधव गटविकास अधिकारी तिवसा