पीआरसीचा दौरा मिनीमंत्रालयात बैठकीचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:27+5:302021-09-17T04:17:27+5:30
अमरावती : राज्य विधिमंडळाची पंचायतराज समिती ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभृमीवर ...
अमरावती : राज्य विधिमंडळाची पंचायतराज समिती ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभृमीवर जिल्हा परिषदेची सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, याअनुषंगाने सध्या मिनिमंत्रालयात आढावा बैठकीचा जोर सुरू आहे. गुरुवारी मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व खातेप्रमुखांकडून आढावा घेतला.
सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाचे परीक्षण केले जाणार आहे. यासाठी समितीला पाठविलेल्या माहिती पुस्तिकेत संबंधित प्रश्न, लेखा आक्षेपात शासन निर्णय, परिपत्रके अधिनियम आदीचा उल्लेख केल्यानुसार सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या सर्व विभाकडून गोळा करण्याचे काम दोन दिवसापासून सुरू आहे. पंचायतराज समितीच्या दौऱ्यात महत्त्वाचे विषयाची इत्यंभूत माहिती खातेप्रमुख अधिनस्त यंत्रणेकडून गोळा करत आहेत. पीआरसी समिती भेटी आवश्यक माहितीचे अपडेट मुख्यकार्यकारी अधिकारी विविध विभागाकडून घेत आहेत. याकरिता सध्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकी होत आहेत.