विशेष सभेच्या मुद्यावर सभागृहात गदारोळ

By admin | Published: March 30, 2016 12:43 AM2016-03-30T00:43:12+5:302016-03-30T00:43:12+5:30

जिल्हा परिषदेत मेळघाटातील आरोग्य विभागाशी संबंधित एकाच विषयावर अध्यक्षांनी विशेष सभा का बोलविली?

At the meeting of special meeting, | विशेष सभेच्या मुद्यावर सभागृहात गदारोळ

विशेष सभेच्या मुद्यावर सभागृहात गदारोळ

Next

जिल्हा परिषद : सदस्य आक्रमक, अध्यक्षांची स्पष्ट भूमिका
अमरावती : जिल्हा परिषदेत मेळघाटातील आरोग्य विभागाशी संबंधित एकाच विषयावर अध्यक्षांनी विशेष सभा का बोलविली? या विषयावर मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात सदस्यांनी एकच गदारोळ केला. विशेष म्हणजे या विषयावर मेळघाटातील जिल्हा परिषद सदस्यच एकमेका समोर उभे ठाकले होते.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झालेला आठ पीएच लेखाशीर्षाखालील निधी हा मार्च पूर्वी खर्च व्हावा,आदिवासी भागातील विकासाचा निधी परत जावू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या १७ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना विशेष सभा घेण्याची विनंती केली होती. इतर विभागाच्या निधी खर्चाचे विषय या सभेत का घेतले नाहीत, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य सुरेखा ठाकरे, मनोहर सुने, सदाशिव खडके, वनमाला खडके, आदींनी उपस्थित केला. यावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सदस्यांनी सभागृहात एकच गोंधळ केला. अध्यक्षांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणीदेखील जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी यावेळी केली.
अशातच मेळघाटाचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर सूर्यवंशी, श्रीपाल पाल, महेंद्रसिंग गैलवार यांनी अध्यक्षांची बाजू घेत आम्ही १७ सदस्यांनी मेळघाटातील आरोग्याच्या विकासाचा निधी हा या भागात खर्च करावा आणि तो शासनाकडे परत जाऊ नये यासाठी ही विशेष सभा बोलविण्याची मागणी केली. मात्र जे इतर विभागाचा आढावा का घेतला जात नाही, असा जो प्रश्न करीत आहेत. त्यावर सूर्यवंशी यांनी यापूर्वीच अध्यक्षांना सर्वच विभागाच्या जमा खर्चाच्या निधीचा आढावा घेण्यासाठी २४ जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र विशेष सभेसाठी अध्यक्षांना दिले होते.
यापैकी १४ सदस्यांनी अध्यक्षांना लेखी स्वरूपात आमचे समाधान झाले आहे. त्यामुळे विशेष सभा घेण्यास आम्ही असहमत आहो असे पत्र दिले. त्यामुळे ५९ सदस्य असलेल्या जिल्हा परिषद सभागृहाचा किमान असा विश्वासघात करून नका अशी विनंती किरत हा मुद्दा मोडून काढला. यावर अनेक सदस्यांनी आपली बाजू मांडली मात्र अध्यक्षांनी अन्य विभागाच्या आढाव्याच्या मागणीचा सदस्यांचा अट्टाहास वेळेवर येणाऱ्या विषयाला परवानगी देता ही सभा आटोपती घेतली.

Web Title: At the meeting of special meeting,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.