केंद्रीय संसदीय समितीची विविध ठिकाणी भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:05+5:302021-08-18T04:19:05+5:30
अमरावती : ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या संसदीय समिती खासदार प्रताप जाधव यांचे यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार ...
अमरावती : ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या संसदीय समिती खासदार प्रताप जाधव यांचे यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार १७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दाखल झाली.या समितीचे सदस्य असलेल्या जवळपास ८ खासदारांनी विविध तालुक्यातील गावांना भेटी देवून तेथील ग्रामविकास व अन्य कामांची ऑन दी स्पॉट पाहणी करून आढावा घेतल्याची माहिती आहे. या समितीच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती.
केंद्राची ही समिती ग्रामविकासाशी संबंधित असलेल्या १२ विषयांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही समिती जिल्हा परिषद व जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख यांची संयुक्त बैठक सुद्धा घेणार आहे.तत्पूर्वी समितीच्या सदस्यांनी अमरावती तालुक्यातील भानखेडा, वलगांव, दर्यापूर मधील शिंगणापूर, खल्लार, कापुसतळणी,अंजनगाव सुजी,अचलपूर,आदी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना तसेच बॅक शाखांंना भेटी देवून तेथील कामकाजची माहिती घेतली.याशिवाय तिवसा,मोर्शी आणि वरूड तालुक्याचाही समितीने दौरा केला. या समितीने दोन पथक तयार केले होते. जिल्ह्यात ८ खासदार समिती दौऱ्यात सहभागी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.दोन चमूनी विविध तालुक्यातील निवडक गावांना भेटी देवून जिल्हा परिषदस्तरावर ग्रामविकास विभागाचे विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संसदीय समिती घेत आहे. दरम्यान समितीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचे उपस्थितीत बुधवारी जिल्हा परिषद,बॅकेच्या अधिकाऱ्याकडून कामाचा आढावा घेतला जाणार आहे.