मेळघाट अलर्ट, बेपत्ता अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात दिसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:39 PM2018-07-15T22:39:04+5:302018-07-15T22:39:34+5:30

सत्तेच्या विरोधी बाकावर असताना मेळघाटचा कानाकोपरा छानून आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या मृत्यूचा आवाज मुंबईत काढणारे राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाली असतानाही फिरकले नसल्याने आरोग्यमंत्री गेले कुठे, असा सवाल आदिवासींनी उपस्थित केला.

Melghat alerts, missing officers-employees appeared in the headquarters | मेळघाट अलर्ट, बेपत्ता अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात दिसले

मेळघाट अलर्ट, बेपत्ता अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात दिसले

Next
ठळक मुद्देआरोग्य संचालकांचा वांझोटा दौरा : महिनाभरात दुसऱ्यांदा आरोग्य संचालकांचे मेळघाटात आगमन

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : सत्तेच्या विरोधी बाकावर असताना मेळघाटचा कानाकोपरा छानून आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या मृत्यूचा आवाज मुंबईत काढणारे राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाली असतानाही फिरकले नसल्याने आरोग्यमंत्री गेले कुठे, असा सवाल आदिवासींनी उपस्थित केला. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा रिक्त असल्याने संचालकांचा दौराही वांझोटा ठरला. शनिवार, रविवारी बेपत्ता अधिकारी व कर्मचारी दुर्गम अतिदुर्गम आदिवासी खेड्यात मुख्यालयात दिसल्याचे आश्चर्य घडले आहे.
तीन महिन्यांत कुपोषणाच्या आकडेवारीत प्रचंड वाढ झाली असून ९० दिवसांत ११४ बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होतात राज्याचे आरोग्य संचालक संजीव कांबळे यांनी दोन दिवसांतील दीड दिवस मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील रस्त्यावर असणाºया बिहाली, सेमाडोह, हरिसाल, ग्रामीण रुग्णालयाला भेटी दिल्या. आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकांशी संवाद साधला. परंतु मेळघाटात मृत्यूचे तांडव सुरू असतानाही मेळघाट दौºयावर आलेल्या आरोग्य संचालकांनी अतिदुर्गम किंवा धारणी तालुक्यातील बालमृत्यू अधिक होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांना भेटी देण्याचे टाळले. त्यामुळे येथील खरी परिस्थिती काय, याचा आढावा रस्त्यावरूनच त्यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बालमृत्यूच्या आकडेवारीत वाढ होत असताना महिनाभरात दुसºयांदा मेळघाटात येणारे आरोग्य संचालक नागपूर अधिवेशनानिमित्त पर्यटनासाठी आले होते का, असा प्रश्न आदिवासी करीत आहेत.
वांझोटा दौरा, डॉक्टरांच्या जागा रिक्तच
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अ आणि ब वर्ग डॉक्टरांच्या जागा मागील सहा वर्षांपासून रिक्त आहेत. बालमृत्यूचे प्रमाण वाढत असताना रिक्त जागा आरोग्य विभागामार्फत भरल्या गेल्या नाहीत. एका महिन्यात दुसºयांदा मेळघाटच्या दौºयावर आलेले आरोग्य संचालक डॉक्टरांच्या रिक्त जागा भरतील अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे. अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी डॉक्टरांच्या बदलीत मोठ्या प्रमाणात घोळ केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. अनेक डॉक्टरांनी अजूनही मेळघाट बघितले नाही. त्यांना का पाठविण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे आरोग्य संचालकांच्या दौरा वांझोटा ठरला आहे.
कुठे गेले आरोग्यमंत्री?
मेळघाटातील बालमृत्यूसाठी विरोधी पक्षात असताना अतिसंवेदनशीलता दाखविणारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत मेळघाटातील बालमृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यावरही नागपूर अधिवेशन काळात मेळघाटात न फिरकल्याने विरोधी पक्षात असताना मेळघाटातील मूर्तीची ओरड करायची सत्तेत विसरायचे का, असाही सवाल आदिवासी करू लागले आहेत.

Web Title: Melghat alerts, missing officers-employees appeared in the headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.