मेळघाटात भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंलरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:57 PM2017-08-20T14:57:31+5:302017-08-20T15:10:26+5:30

अमरावती विभागात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाºया मेळघाटातही यंदा दुष्काळाचे सावट पसरले आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Melghat crops gets sprinkler rain besides rainy season | मेळघाटात भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंलरने पाणी

मेळघाटात भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंलरने पाणी

Next
ठळक मुद्देदुष्काळाचे सावट १५ दिवसांत केवळ २० मिमी पाऊस

वीरेंद्रकुमार जोगी
अमरावती : अमरावती विभागात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाºया मेळघाटातही यंदा दुष्काळाचे सावट पसरले आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मेळघाटात जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाने मोठी दडी दिल्यामुळे मेळघाटात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात यावेळी अंदाजे १२०० मि.मी पाऊस होतो असे हवामान खात्याच्या आकड्यांवरून दिसते. मात्र यंदा पावसाने ४५० मिमीचा आक डा देखील पार केलेला नाही. मागील आठ दिवसांपासून धारणी तालुक्यात एकही थेंब पाऊस झालेला नाही.
हवामान खात्याच्या अकाडेवारीनुसार १ आॅगस्ट रोजी धारणी तालुक्यात ४३० मिमी पाऊस झाला होता. १७ आॅगस्ट पर्यंत पावसाची ही आकडेवारी ४५१ मिमी पर्यंतच पोहचली आहे. मागील वर्षी १ आॅगस्ट रोजी ८२३ मिमी व १८ आॅगस्ट रोजी १००३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. यावरून गत वषीच्या व यंदा झालेल्या पावसात तफावत दिसून येते.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला, त्यावर शेतकºयांनी पिकांची पेरणी केली. दरम्यान येणाºया पावसाने शेतमाल जसातसा बचावला आहे, मात्र मागील तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकºयांना भर पावसाळ्यात ओलीत करावे लागत आहे. विशेष म्हणजे किड रोगापासून बचाव व्हावा यासाठी पट पाणी देण्यापेक्षा शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करीत आहेत. येथील आदीवासी व शेतकरी पावसाचा अंदाज प्राणी, झाडे व निसर्गात होणारा बदल यावरून लावत असतात. तरी देखील हवामान खात्याच्या अंदाजावर मागील काही वर्षात बसलेला त्यांचा विश्वास यंदा ढासळला आहे.

मागील ३५-४० वर्षांत पावसाची एवढी बिकट परिस्थिती आम्ही पाहिली नाही. मेळघाटाला पावसाचे देणे लाभले आहे. यंदा मात्र पाऊस नसल्याने शेतकरी भर पावसाळ्यात ओलित करीत आहे.
- कैलास मालविया
शेतकरी, दिया

Web Title: Melghat crops gets sprinkler rain besides rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.