मेळघाट एक्स्प्रेस धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 09:58 PM2017-10-01T21:58:41+5:302017-10-01T21:58:52+5:30
वनविभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. त्याअनुषंगाने वाघांचे संवर्धन, संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांचे दर्शन आणि निसर्ग सौंदर्यांचा पर्यटकांना आनंद लुटता यावा, ....
अमरावती : वनविभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. त्याअनुषंगाने वाघांचे संवर्धन, संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांचे दर्शन आणि निसर्ग सौंदर्यांचा पर्यटकांना आनंद लुटता यावा, यासाठी रविवारी मेळघाट एक्स्प्रेस पर्यटन बससेवेला पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी आ.सुनील देशमुख यांची उपस्थिती होती.
मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी ही बससुरु करण्यात येत असल्याचे एम.एस. रेड्डी यांनी यांनी सांगितले. यावेळी सीसीएफ प्रवीण चव्हाण, रवींद्र वानखडे, प्रदीप मसराम, क्रेडाईचे शैलेश वानखडे, जयंत वडतकर, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे, आरएफओ हरिश्चंद्र पडगव्हाणकर, आशिष कोकाटे, विशाल बनसोड, सावन देशमुख, गौरव कडू, अरुण तिखे, इंद्रप्रताप ठाकरे आदी उपस्थित होते.