मेळघाटात परिचारिकेने डॉक्टरला चपलेने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:23+5:302021-08-12T04:17:23+5:30

टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रातील घटना, दवाखान्यातच दारू ढोसून अश्लील शिवीगाळ, डॉक्टर बेपत्ता लोकमत विशेष नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : ...

In Melghat, the nurse slapped the doctor | मेळघाटात परिचारिकेने डॉक्टरला चपलेने बदडले

मेळघाटात परिचारिकेने डॉक्टरला चपलेने बदडले

Next

टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रातील घटना, दवाखान्यातच दारू ढोसून अश्लील शिवीगाळ, डॉक्टर बेपत्ता

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रात कार्यरत एका वैद्यकीय अधिकाऱ्याला परिचारिकेने दारू पिऊन अश्लील शिवीगाळ केली. यामुळे तिने त्याला चपलेने चांगलेच चोपले. यासंदर्भात तक्रार देण्यात आलेली नाही. तथापि, अश्लील शिवीगाळीची ध्वनिफित वायरल झाली आहे. लोकमतकडे काहींनी ती पाठविली. दुसरीकडे आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात १४ जुलैच्या रात्री एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दवाखान्यातच यथेच्छ दारू ढोसली. यादरम्यान एका परिचारिकेला अश्लील शिवीगाळ करीत असल्याने उपस्थित कर्मचाऱ्याने ‘त्या’ डॉक्टरला समजावले. मात्र, तो कुणालाही जुमानत नव्हता . प्रकरण अंगलट येणार असल्याचे पाहून १४ जुलैला रात्री २ वाजता आपली चारचाकी घेऊन डॉक्टरने पोबारा केला. १९ जुलैला परत आला. दुपारी ३ च्या सुमारास अश्लील शिवीगाळ करणारा डॉक्टर आल्याचे माहिती होताच महिला परिचारिकेने त्याला चपलेचा ‘प्रसाद’ दिला. तेव्हापासून डॉक्टर बेपत्ता असल्याची माहिती आहे.

बॉक्स

मी करोडपती आहे...

आय एम ... एमओ हीअर.... मी फॉरेनमध्ये फिरणारा माणूस आहे... मी करोडपती आहे... तुमच्याने जे होते, ते तुम्ही करून घ्या. माझी तक्रार करा... मी... डॉ... बेकार आहे, असे डीएचओला सांगा. त्या..... बाईचं काय करायचे... मी पण काही बांगड्या थोडी घातल्या आहेत... माझ्याशी पंगा कायले घ्यायला पाहिजे.... अशी त्या डॉक्टरची अश्लील शिवीगाळ असलेली ध्वनिफीत व्हायरल झाली आहे. मात्र, त्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

कोट

आपण या काळात सुटीवर होतो. कुठल्याच प्रकारची तक्रार अद्याप आलेली नाही. एक डॉक्टर अनधिकृतपणे गैरहजर आहे. आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही आहे. सदर प्रकार घडल्याची चर्चा आपल्यासुद्धा कानावर आली. तक्रार येताच संबंधितांविरुद्ध वरिष्ठांना सांगून कारवाई करण्यात येईल.

चंदन पिंपरकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, टेम्ब्रुसोंडा

Web Title: In Melghat, the nurse slapped the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.