मेळघाटात श्रद्धेच्या बेटावर अंधश्रद्धेची विषवल्ली फोफावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:55+5:302021-07-20T04:10:55+5:30

प्रदीप भाकरे अमरावती : घाटांच्या ‘मेळा’तील धारणी व चिखलदरा या दोन आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध असल्या तरी ...

In Melghat, the poison of superstition is spreading on the island of faith | मेळघाटात श्रद्धेच्या बेटावर अंधश्रद्धेची विषवल्ली फोफावतेय

मेळघाटात श्रद्धेच्या बेटावर अंधश्रद्धेची विषवल्ली फोफावतेय

Next

प्रदीप भाकरे

अमरावती : घाटांच्या ‘मेळा’तील धारणी व चिखलदरा या दोन आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध असल्या तरी तेथील स्थानिक उपचारासाठी गावातील भूमका, परिहारांकडेच धाव घेतात. रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचला की, भूमका, वैदू हात वर करतात. सर्पदंशावरही हे वैदू रामबाण ठरतील, हा विश्वास त्यांना मरणाच्या दारात पोहचवित आहे.

मेळघाटातील स्थानिकांच्या भूमका, वैदूंवरील अवाजवी श्रद्धेने तेथे अंधश्रद्धेची विषवल्ली पसरविली आहे. सर्पदंश झाल्यानंतरही भूमकाकडून उपचार करून घेणे चिखलदरा तालुक्यातील फुलवंती कासदेकर या ३० वर्षीय महिलेच्या जिवावर बेतले. त्या पार्श्वभूमिवर भूमकांकडील उपचार, स्थानिकांची त्यांच्यावर असलेली अवाजवी श्रद्धा या बाबी ऐरणीवर आल्या आहेत. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ प्रथमोपचाराची सोय असल्याने तेथून अन्य रुग्णांप्रमाणे सर्पदंशाच्या रुग्णांनादेखील अमरावती रेफर केले जाते.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध असते, पण विषारी सापांवर त्या प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास त्याला अमरावती स्थित जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले जाते. मात्र, या प्रवासात अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे मेळघाटातील अंधश्रद्धेची विषवल्ली उपटून काढण्यासोबतच लुळी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नागरी वस्तांमध्ये मण्यार, नाग, घोणस व फुरसे या सापांच्या चार विषारी प्रजाती प्रामुख्याने आढळतात.

बॉक्स

अशा घडल्या घटना

सन सर्पदंश मृत्यू

२०१९ - ३६०४ - ३१

२०२० - १८६०- २३

२०२१ -५६२ - ०३

--------------------------------------------------

इर्विनमध्ये १५९५ व्हायल उपलब्ध

सर्पदंशावर प्रभावी असलेली ॲन्टी स्नेक व्हेनम लसीचे जिल्हा सामान्य रुग्णालयात १५९५ व्हायल उपलब्ध आहेत. पीएचसी स्तरावरदेखील आवश्यक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

-----------------

महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नाही लस

अमरावती महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या दवाखान्यांमध्ये केवळ ओपीडी सुविधा उपलब्ध आहे. १० लाखांच्या अमरावती शहरात महापालिका दवाखान्यात ॲन्टी स्नेक व्हेनम उपलब्ध नाही. आयसोलेशन दवाखाना व बडनेरा स्थित मोदी हॉस्पिटलमध्ये ती व्यवस्था केली जाऊ शकते, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

-----------------

बॉक्स

आवळपट्टी महत्त्वाची

सर्पदंश झाल्यावर त्या जागी प्रचंड वेदना सुरू होतात. सर्प विषारी असेल, तर त्याच्या दोन दातांचा चावा चटकन लक्षात येतो. सर्प बिनविषारी असेल, तर अर्धलंबवर्तुळाकार दातांच्या पंक्ती दिसतात.

सर्प विषारी असो अगर बिनविषारी, वेदना प्रचंड असतात. अशा वेळी घाबरून न जाता ज्या ठिकाणी दंश झाला असेल त्या ठिकाणापासून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी.

घरात असलेली रिबिन, कपड्याची पट्टी, दोरी यापैकी कशाचाही त्यासाठी उपयोग करता येतो. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरण्यापासून रोखले जाते आणि वैद्यकीय उपचारांसाठी वेळ मिळतो.

Web Title: In Melghat, the poison of superstition is spreading on the island of faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.