मेळघाटचा टँकर पळविला

By admin | Published: April 30, 2017 12:12 AM2017-04-30T00:12:02+5:302017-04-30T00:12:02+5:30

गत महिनाभरापासून तालुक्यातील १५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन टँकरने सहा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

Melghat tanker escaped | मेळघाटचा टँकर पळविला

मेळघाटचा टँकर पळविला

Next

आदिवासींची भटकंती : तारुबांद्यात उपसभापतींना घेराव, १५ गावांत पाणी पेटले
चिखलदरा : गत महिनाभरापासून तालुक्यातील १५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन टँकरने सहा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मेळघाटसाठी जिल्ह्यातून पाठविलेला टँकर परस्पर चांदूररेल्वे तालुक्यात पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तालुक्यातील पल्लई, लवादा, आलापोट, भांडी ढोमणीफाटा, तारूबांदा या सहा गावांना पाणी पुरवठा केला जात असून, एक महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झलेल्या तारुबांदा, बदनापूर, ठोबनबल्डी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, गौलखेडा बाजार, आठवनदी, मनभंग, भिलखेडा या गावातसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले.
सचिव बेपत्ता, अपूर्ण प्रस्ताव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सचिव मुख्यालयी न राहता परतवाडा, अमरावती येथून ग्रामपंचायतींचा कारोबार पाहत असल्याने त्याचा फटका आदिवासींना बसला आहे. पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकांकडून प्रस्ताव न पाठविले, अपूर्ण पाठविल्या जात असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी )

टँकरची पळवापळवी
चिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईग्रस्त गावे पाहता जिल्हास्तरावरून टँकरचे नियोजन करण्यात आले. मात्र, येथे येणारा टँकर चांदूररेल्वे तालुकयातील या गावी १५ दिवसांपूर्वी पळविला. परिणामी तारुबांदा येथे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश कुणी फिरविला याची तपासणी करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी केली आहे. तारूबांदा येथे आदिवासींनी गुरूवारी रात्री त्यांना पाण्यासाठी घेराव घातला.

माजी आमदारांच्या
गावात पाणीटंचाई
मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे व विद्यमान सभापती कविता काळे यांच्या गौलखेडा बाजार या गावात पाणीटंचईची समस्या उद्भवली असून, तेथेसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

विहिरी अधिगृहित
टँकरसह पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी कोरडा, वस्तादूर, कालापाणी, टंडू, मल्हारा, चिखली येथील विहिरी आणि बोअरवेल अधिगृहित करण्यात आले आहे. मात्र, टँकरच नसल्याने अनेक गावात प्रशासनाच्या लापरवाहीने आदिवासंींना पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे.

सहा गावांमध्ये तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
- सैफन नदाफ,
तहसीलदार, चिखलदरा

Web Title: Melghat tanker escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.