सैनिकाच्या अपघातील निधनाने मेळघाट हळहळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:35+5:302020-12-26T04:11:35+5:30

वडिलांसमवेतचा चिमुकलीचा पहिलाच वाढदिवस अखेरचा ठरला, शासकीय मानवंदनेकरिता गावकऱ्यांसह प्रशासन सज्ज अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ...

Melghat was shaken by the accidental death of a soldier | सैनिकाच्या अपघातील निधनाने मेळघाट हळहळला

सैनिकाच्या अपघातील निधनाने मेळघाट हळहळला

Next

वडिलांसमवेतचा चिमुकलीचा पहिलाच वाढदिवस अखेरचा ठरला, शासकीय मानवंदनेकरिता गावकऱ्यांसह प्रशासन सज्ज

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिकाच्या अपघाती निधनाने अचलपूरसह मेळघाट हळहळला असून, त्या चिमुकलीचा वडिलांसमवेतचा पहिलाच वाढदिवस अखेरचा ठरला आहे.

हिमाचल प्रदेशातील कुलुमनाली क्षेत्रात देशाच्या सीमेवर तैनात असताना सैनिक कैलास कालू दहीकर २७, रा.पिंपळखुटा, अचलपूर यांचे अपघातील निधन झाले. उणे मायन्स १५ डिग्री सेल्सियस तापमानावरील थंडीपासून बचावाकरिता रॉकेलवर चालणारे हिटर टेंटमध्ये लावल्या गेले. यात घडलेल्या दुर्देवी घटनेत त्यांचे अपघाती निधन झाले.

पिंपळखुटा हे अचपलूर तालुक्यातील आदिवासीबहूल छोटेशे गाव. १ ली ते ५ वी पर्यंत चिखलदरा येथे, तर पुढील शिक्षण अमरावती येथील नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेल्या कैलासच्या मनात लहानपनापासूनच देशसेवेची बीजे रोवली गेली होती. वयाच्या २१ व्या वर्षी तो सैन्यदलात भरती झाला. सोबत चुलतभाऊ प्रकाश दहीकरलाही घेतले. कैलास आणि प्रकाश दोन्ही भावंडांचे सैनिक प्रशिक्षणही एकत्रच झाले आणि नंतर बटालीयननुसार ते वेगळे झालेत.

कैलासच्या घरची परिस्थिती बेताचीच. दीड दोन एकर शेती आई, वडील, भाऊ, पत्नी बबली आणि दीड वर्षाची चैताली नामक चिमुकली, असे त्यांचे एकत्र कुटूंब. कुटुंबीयांच्या भेटीकरिता ते फेब्रुवारी महिन्यात पिंपळखुटा येथे आलाण मध्येच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जुलै २०२० पर्यंत तो कुटूंबींयांसमवेत राहिला. ११ जुलै २०२० ला तो परत कर्तव्यावर हजर होण्याकरिता नागपूरहून पुढे गेला. आई-वडिलांसमवेत पत्नी व दीड वर्षीय चिमुकलीही त्याला निरोप देण्यास नागपूरपर्यंत गेली. या सर्वांच्या भावनिक भेटीचा तो अखेरचा क्षण ठरला.

पिंपळखुट्याला असतांना कैलासने आपल्या चैताली नामक एकुलत्या एक चिमुकलीचा पहिला वाढदिवस १० फेब्रुवारीला साजरा केला. या वाढदिवसाला त्याने आपल्या मित्रांना गावकऱ्यांसह, नातेवाईंकांना घरीच जेवण दिले. कोरोनाची नियमावली पाळत त्याने सर्वांसोबत काही क्षण घालवलेत. दरम्यान त्याच्या या अपघाती निधनाने त्याच्या सहवासातील एकएक क्षण सर्वांना आठवत असून डोळे पानावले आहेत.

बॉक्स

गावकऱ्यांचे श्रमदान

कैलासच्या अपघातील निधणानंतर, त्याला अखेरचा निरोप, शासकीय मानवंदना देण्याकरिता, तहसीलदार अचलपूर व ठाणेदार परतवाडा यांनी गावात जाऊन जागेची पाहणी केली. देवगावचे सरपंच गजानन येवले यांनी पिंपळखुटा येथील आपले शेत त्याकरिता उपलब्ध करुन दिले. अन् सरपंच,उपसरपंचासह गावकरी आणि मित्रमंडळी श्रमदानाकरिता पुढे सरसावलेत. श्रमदानाने शेतातील जागा साफ केली असून तेथे चबुतरा ओटा बांधण्यात आला आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी कैलास दहिकरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Web Title: Melghat was shaken by the accidental death of a soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.