मेळघाटच्या शिक्षणाला आले अच्छे दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:09 PM2018-04-06T23:09:36+5:302018-04-06T23:09:36+5:30

‘लोकमत’ने गेल्या तीन महिन्यांपासून सतत शाळांना भेटी देऊन ‘मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा’ या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली.

Melghat's education came good days! | मेळघाटच्या शिक्षणाला आले अच्छे दिन!

मेळघाटच्या शिक्षणाला आले अच्छे दिन!

Next
ठळक मुद्देचित्र पालटले : विद्यार्थ्यांपूर्वी पोहोचू लागलेत शिक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : ‘लोकमत’ने गेल्या तीन महिन्यांपासून सतत शाळांना भेटी देऊन ‘मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा’ या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. शाळा प्रशासनाला तंबी देताच आता शिक्षक मंडळी शाळेत वेळेवर पोहोचत आहेत, तर विद्यार्थ्यांची त्यांना वाट पाहावी लागत आहे. हे चित्र ‘लोकमत’च्या वार्तांकनामुळे झाल्याची चर्चा गावोगावी असून, याकरिता पालकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.
मेळघाटात शिक्षणाची दयनीय अवस्था लपून राहिलेली नाही. येथील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे शिक्षक हे आळीपाळीने दांडी मारून आपले कर्तव्य बजावत होते. त्यामुळे पूर्वीच वर्गसंख्या जास्त व शिक्षक कमी असताना दांडीबहाद्दरांमुळे शिक्षण व्यवस्था ‘भगवान भरोसे’ सुरू होते. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांचेही प्रचंड शैक्षणिक नुकसान होत होते. अशा दांडी बहाद्दुर शिक्षकांवर वरिष्ठांचा कोणताच दबाव नसल्याने मेळघाटात शिक्षणाची दयनीय अवस्था झाली होती. हे चित्र पालटावे व शिक्षकांनी आपणाकडे असलेले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाळावे, याकरिता ‘लोकमत’ने १६ जानेवारीपासून ‘मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा’ या शीर्षकाखाली विविध शाळांना आकस्मिक भेटी देऊन विदारक चित्राची मांडणी केली. परिणामी पूर्वी विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहात होते. आता शिक्षक वेळेवर पोहोचू लागले असून, त्यांना विद्यार्थ्यांची वाट पाहावी लागत आहे.

मेळघाटातील शिक्षणाचे वास्तव चित्र मांडून ‘लोकमत’ने सामाजिक बांधीलकी निर्माण केली आहे. येथील शाळांचे चित्र बदलत आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होणार आहे.
- विजय राठोड
एसडीओ, धारणी.

‘लोकमत’द्वारा गेल्या तीन महिन्यांपासून सतत शाळांना भेटी देऊन वास्तव मांडणी केली.आता शिक्षकवर्ग वेळेवर कर्तव्य बजावत आहेत. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर निश्चित पडेल.
- उमेश देशमुख, बीडीओ

जि. प. शाळेतील वास्तव्याची माहिती ‘लोकमत’ने सतत मांडत शिक्षकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक बातमीवर शाळांना पत्र देऊन व तोंडी अशाप्रकारे खुलासे मागविण्यात आले.
- युनूस इस्माईल, गट शिक्षण अधिकारी, पं. स. धारणी.

Web Title: Melghat's education came good days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.