रस्ता सुरक्षा समितीवर आता खासदार, जिल्हाधिकारी राहतील सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 08:35 PM2017-12-03T20:35:15+5:302017-12-03T20:35:32+5:30
अमरावती : जिल्हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार अमरावती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे गुरुवारी धडकले असून, यापुढे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी ऐवजी खासदार राहणार आहेत.
अमरावती : जिल्हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार अमरावती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे गुरुवारी धडकले असून, यापुढे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी ऐवजी खासदार राहणार आहेत. खासदारांच्या अध्यक्षतेखाली ही नवी समिती कार्यान्वित करण्यात येणार आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा रस्ता सुरक्षा समितीवर अध्यक्ष म्हणून खासदारांची निवड होणार आहे. यापूर्वी अध्यक्षपदी जिल्हाधिकारी, सचिवपदी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, इतर अनेक महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी सदस्य होते. रस्त्यावरील वाहतूक नियमनाच्या दृष्टिकोणातून अनेक तक्रारी या समितीकडे प्राप्त होतात. जिल्हाधिकाºयांकडे अनेक समित्यांचे अध्यक्षपद आहे, शिवाय त्यांच्या प्रशासकीय कामांचा व्याप लक्षात घेऊन खासदारांना या समितीचे अध्यक्ष करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे आदेश नुकतेच धडकले. सचिवपदी प्रादेशिक परिवहन अधिकारी राहतील, तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचाही समिती सदस्य म्हणून समावेश राहणार आहे.
असे असतील समितीचे सदस्य
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, महापालिकेचे महापौर, जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील सर्व आमदार समितीचे सदस्य राहणार आहेत. जिल्ह्यातील उपविभागीय न्यायदंडाधिकारी या समितीत असणार आहेत. अध्यक्षांद्वारा तीन अशासकीय प्रतिनीधी समाविष्ट केले जाणार आहेत. विभागातील आॅटोमोबाइल डिलर संघटनेचे प्रतिनिधी, मालवाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, राज्यमार्ग विभागाचे अधिकारी या समितीत असणार आहेत. आरटीओ व एआरटीओ या समितीचे सदस्य सचिव राहतील.
रस्ता सुरक्षा समितीचे कामकाज
जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुरक्षेवर लक्ष, रस्ता अपघातांच्या आकडेवारीवर लक्ष, रस्ता अपघातांच्या कारणांची मीमांसा, राष्ट्रीय/राज्य रस्ते सुरक्षा परिषदेला सूचना-तक्रारी नोंदवणे आदी बाबींवर रस्ता सुरक्षा समितीचे कामकाज चालणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून यासंदर्भाचे पत्र प्राप्त झाले आहे. लवकरच बैठक घेऊन नवीन समिती गठीत करण्यात येईल.
- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती