‘त्या’ रथयात्रेने जागविल्या मुंडेंच्या आठवणी
By admin | Published: June 3, 2014 11:44 PM2014-06-03T23:44:48+5:302014-06-03T23:44:48+5:30
आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांविरुध्द अटक सत्र सुरू झाले तेव्हा नाशीकच्या तुरूंगात गोपीनाथ मुंडे व अमरावतीच्या कारागृहात जिल्ह्यातील अनेक नेते होते. या काळातच मुंडे
आणीबाणीच्या काळापासून जुळला संपर्क
मोहन राऊत - अमरावती
आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांविरुध्द अटक सत्र सुरू झाले तेव्हा नाशीकच्या तुरूंगात गोपीनाथ मुंडे व अमरावतीच्या कारागृहात जिल्ह्यातील अनेक नेते होते. या काळातच मुंडे यांचा संपर्क जिल्ह्याशी आला व तब्बल चार दशकांपासून हा संपर्क आजपर्यंत कायम होता.
सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत आपल्या कतृत्वाने झेप घेणारे लोकनेते तथा महाराष्ट्रातील भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत आज मंगळवारी सकाळी कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का भाजपा नेत्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही बसला. मुंडे यांची अमरावती जिल्ह्याशी नाळ जुळलेली होती. सन १९७४ च्या आणीबाणीच्या काळानंतर जनता पार्टीमध्ये अधिक सक्रिय झालेले मुंडे सन १९७७ मध्ये महाराष्ट्राचे संयुक्त सचिव असतांना सर्वप्रथम धामणगाव येथे आले होते.. प्रत्येक गावात व घरात जनता पार्टी पोहचविण्याचे काम व हा पक्ष लोकांच्या मना मनात ठासवून देण्याचे कार्य मुंडे करीत होते. महाराष्ट्रातील त्यावेळी पक्ष बांधणीच्या आठवणीला आज अरुण अडसड यांनी उजाळा दिला. सन १९९0 मध्ये श्रीराम रथयात्रा जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात निघाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात या रथ यात्रेचे सारथी म्हणून मुंडे होते. विदर्भाचे सोने म्हणजे कापुस आणि कापसाला भाव मिळावा तसेच शेतकर्यांना पूर्णत: कर्ज मुक्ती द्यावी त्यासाठी भैरवसिंह शेखावत यांच्या नेतृत्वात काढलेल्या शेतकरी कर्ज मुक्ती रथयात्रेचा पुढाकार गोपीनाथ मुंडे यांनी घेतला.