मासिक पाळीत कोरोना लसीकरण सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:22+5:302021-05-09T04:13:22+5:30

अमरावती : मासिक पाळीत स्त्रियांनी कोरोना लस घेणे सुरक्षित आहे. गर्भवती महिलांना शासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. याविषयीच्या ...

Menstrual corona vaccination is safe | मासिक पाळीत कोरोना लसीकरण सुरक्षित

मासिक पाळीत कोरोना लसीकरण सुरक्षित

Next

अमरावती : मासिक पाळीत स्त्रियांनी कोरोना लस घेणे सुरक्षित आहे. गर्भवती महिलांना शासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. याविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. गर्भवती महिलांनी कोरोना नियमांचे पालन करून आपली काळजी घेणे महत्वाचे आहे. सध्या हाच एकमेव उपाय असल्याचे सांगण्यात आले.

पाश्चात देशात याविषयी अधिक अभ्यास सुरू आहे. परंतु त्याचे निष्कर्ष यायला वेळ लागणार आहे. अमेरिकेत गर्भवती मातांना लस देऊन त्यावर अभ्यास केला जात आहे. भारत सरकारने अध्याप गर्भवती मातांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे गर्भवती मातांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांद्वारे स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

मासिक पाळीत महिलांनी लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. स्तनदा मातांना मात्र ही लस दिली जात नसल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

गाइडलाईन काय सांगतात?

१) १८ वर्षांखालील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत नाही. मात्र, १८ वर्षांवारील सर्व नागरिक लस घेऊ शकतात.

२) गर्भवती महिलांना लस देण्यात येत नाही. मात्र, महिलांना मासिक पाळी सुरू असली तरी लस घेता येते.

३) ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. ९० ते १०० वर्षे वयाचे नागरिक देखील लस घेऊ शकतात.

४) लसीकरणाचे इतर कोणतेच अपाय नाहीत, उलट प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे.

पाईंटर

आतापर्यंत झालेले लसीकरण : ३,१९,५०२

महिला आरोग्य कर्मचारी : १९,१८०

फ्रंट लाईन वर्कर महिला : ७,१००

कोट

स्त्रीरोगतज्ज्ञ काय म्हणतात?

( दोन कोट येणार आहेत)

Web Title: Menstrual corona vaccination is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.