प्रेमविवाह झालेल्या पत्नीचा मानसिक, शारीरिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:30+5:302021-03-25T04:14:30+5:30

अमरावती : आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर काही दिवस संसार सुखाचा गेला. वर्षभरात एक अपत्य झाले. संसारात विरजण पडले व भांडणे ...

Mental and physical abuse of a married wife | प्रेमविवाह झालेल्या पत्नीचा मानसिक, शारीरिक छळ

प्रेमविवाह झालेल्या पत्नीचा मानसिक, शारीरिक छळ

Next

अमरावती : आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर काही दिवस संसार सुखाचा गेला. वर्षभरात एक अपत्य झाले. संसारात विरजण पडले व भांडणे सुरू झाली. सासरच्या मंडळीने छळ करून पतीने मारहाण केल्याची तक्रार पत्नीने गाडगेनगर ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी पती व सासरच्या मंडळीविरुद्ध भादंविचे कलम ४९८(अ). ३२३, ५०६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. ही घटना २८ फेब्रुवारी २०१५ ते २ मार्च २०२१ दरम्यान क्रिष्णानगरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला.

दीपक जेठाणी, अनिल जेठाणी, नीलेश जेठाणी, राकेश जेठाणी, दोन महिला (रा. क्रिष्णानगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीचा दीपकशी सन २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या एका वर्षनंतर त्यांना एक मुलगा झाला. मात्र महिला आरोपी तिच्याशी लहान गोष्टीवरून भांडण करीत होते. लग्नाच्यावेळी आंदण आणले नाही. यासाठी महिलेचा छळ सुरू झाला. तसेच तू वेगळ्या जातीची असल्याचे टोमणे मारून विवाहितेचा छळ करण्यात आला. सदर महिलेच्या लग्नाअधी फिर्यादीचे पतीचे अन्य मुलीशी लग्न झाले होते. ही बाबही तक्रारीत पुढे आली आहे. २१ मार्च रोजी महिलेचे पती दारू पिऊन आला व तिला थाबडबुक्क्यांनी मारहाण करून घरातून निघून जाण्यास सांगितले. तसेच राकेशने जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Web Title: Mental and physical abuse of a married wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.