परतवाड्यात माथेफिरूने पळविली खासगी प्रवासी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 01:17 PM2022-01-11T13:17:58+5:302022-01-11T13:33:56+5:30

परतवाडा बस स्थानक परिसरात अमरावतीसाठी प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभी असलेली खासगी बस एका माथेफिरूने पळवली. हरदेनगरजवळ ही बस झाडाला धडकल्याने अनर्थ टळला. यात दोघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

mentally ill person steals private bus, drives away and caused stir on road | परतवाड्यात माथेफिरूने पळविली खासगी प्रवासी बस

परतवाड्यात माथेफिरूने पळविली खासगी प्रवासी बस

Next
ठळक मुद्देझाडाला धडकल्याने अनर्थ टळला

अमरावती : बस स्थानक परिसरात उभ्या एका खासगी बसला माथेफिरूने पळवून नेत अमरावती मार्गावरील दोन दुचाकी व एका सायकलस्वारास धडक दिली. ही घटना सोमवारी सकाळी दहा १०:२५ च्या सुमारास घडली असून  अर्धा किलोमीटरपर्यंत त्याने ही बस नेली. या मार्गावरील हरदेनगरजवळ ती झाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दोघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. माथेफिरूला ताब्यात घेतले आहे.

जयवर्धन घनश्याम यादव (३२, रा. कांडली) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माथेफिरूचे नाव आहे. जखमींना किरकोळ मार असल्याने पोलिसांकडे त्यांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. एमपी ४८ पी ९९८१ क्रमांकाची खासगी बस परतवाडा आगारानजीक अमरावतीला जाण्यासाठी उभी होती. चालक नाना रूपराव बनसोड (५२, रा. माळवेशपुरा, अचलपूर) व वाहक मो. सादिक अ. रहमान हे लघुशंकेसाठी गेले असता, माथेफिरू जयवर्धन तेथे आला आणि बस पळवून घेऊन गेला. सर्वाधिक वाहतूक असलेल्या अमरावती मार्गावर बस त्याने पळविली. वाटेत दोन दुचाकी व एका सायकलस्वारास बसने धडक दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

नागरिकांनी दिला चोप, ताब्यात घेतले

उभी असलेली खासगी बस अचानक अज्ञात इसमाने पळविल्याचे कळताच बस स्थानक परिसरातील इतर चालक व उपस्थित नागरिक बसमागे धावत सुटले. तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत चांगलाच हल्लाकोळ माजला. याच मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक देत असताना काहींच्या समयसूचकतेने अनर्थ टळला. काही अंतरावर जाऊन झाडाला धडक दिल्याने बस थांबली. हे पाहून माथेफिरू पळू लागला. दुचाकीने आलेल्या चालक-वाहकासह नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. तत्काळ पोलीस पोहोचले व जयवर्धन ताब्यात घेण्यात आले.

दुभाजक आणि झाडामुळे अनर्थ टळला

परतवाडा-अमरावती या मुख्य महामार्गावर शाळा-महाविद्यालयांना कोरोना नियमात सुटू दिली आहे. काही प्रमाणात रस्त्यांची वर्दळ कमीच होती. दुसरीकडे रस्ता चौपदरीकरण असल्याने दुभाजक आहे. जाण्याच्या मार्गावरच माथेफिरू बस घेऊन पळत असल्याने फार मोठा अनर्थ टळला.

सिगारेट द्या, आईला भेटायला जात होतो!

पोलिसांनी ताब्यात घेतलेला माथेफिरू व्यवस्थित माहिती देत नसल्याची माहिती आहे. माझे डोके दुखत आहे. सिगरेट द्या. आईला आणायला जात होतो, अशी वेगवेगळी माहिती देत असून पोलीसही चक्रावून गेले आहेत. पुणे येथील एका घटनेला या प्रकरणाने उजाळा दिला आहे. दैव बलवत्तर म्हणून मोठी अप्रिय घटना घडली नाही.

माथेफिरूला अटक करण्यात आली आहे. त्याची मानसिक अवस्था काय आहे, हे पाहून पुढील चौकशी केली जाणार आहे.

- संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा

Web Title: mentally ill person steals private bus, drives away and caused stir on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.