भामट्याने उडविली व्यापाऱ्यांची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:12+5:302021-08-17T04:19:12+5:30
शुभम पिंजरकर हे सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानासमोर कचऱ्याचा ढीग दिसला. साहजिकच दुकानासमोर कचरा असल्याने शुभमने दुकान ...
शुभम पिंजरकर हे सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानासमोर कचऱ्याचा ढीग दिसला. साहजिकच दुकानासमोर कचरा असल्याने शुभमने दुकान उघडून सोबतची बॅग काऊंटरवर ठेवून कचरा झाडायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात बॅग लंपास झाली. आजसुद्धा मनीष जोहरापूरकर याना दुकान उघडताना कुलूप जॅम झालेले आढळले. कुलपाचे आतील खटके आधीच तोडलेले असल्याने ते उघडले जात नव्हते, त्यात गुंतले असताना भामट्याने काम दाखविले! आधी दुकानाची रेकी केल्या गेली. एक आखूड पायजमा घातलेला, दाढीधारी व्यक्ती सायकल घेऊन खुले सिमेंट मागायला दोन दिवसांपूर्वी आला होता. तोच व्यक्ती आज दुकान उघडताना उपस्थित होता, असे मनीषने सांगितले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती. दोन्ही घटना सारख्याच पद्धतीने घडल्या असून, नवीन ठाणेदार दीपक वानखडे यांना हे एक आव्हान आहे.