पारा ३८ डिग्री सेल्सिअसवर
By admin | Published: March 1, 2017 12:06 AM2017-03-01T00:06:07+5:302017-03-01T00:06:07+5:30
मुंबईतील तापमान ३८.३ डिग्री सेल्सिअसवर पोहाचले असताना त्या तुलनेत अमरावतीचा पाराही भडकू लागला आहे.
उकाडा : रात्रीच्या तापमानात घट
अमरावती : मुंबईतील तापमान ३८.३ डिग्री सेल्सिअसवर पोहाचले असताना त्या तुलनेत अमरावतीचा पाराही भडकू लागला आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अमरावती शहराचे तापमन ३८.२ डिग्रीसेल्सिअस नोंदविल्या गेले . सोमवारी जलविज्ञान प्रकल्पाने घेतलेल्या नोंदीत अमरावतीचे तापमान ३८ डिग्री सेल्सीअसपर्यंत पोहचल्याचे आढळून आहे. फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असून विदर्भातील तापमान हळूहळू वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञाने दिले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमान हळूहळू उच्चाकांकडे जात आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ३२ डिग्री सेल्सिअसवर असणारे तापमान फेब्रुवारीच्या शेवटी ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमान ३ ते ५ डिग्री सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी होते. सद्यस्थितीत मुंबईतील तापमान ३८.८ डिग्रीपर्यंत असून ता ेयंदाचा उच्चांक आहे. े २७ फेब्रुवारीला नवीन पश्चिमी चक्रवात हिमालयाला धडकले आहे. दक्षिण पाकिस्तान, पश्चिम बंगाल व कर्नाटक आणि अरबी समुद्रावरही चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील तापमान वाढणार आहे. मात्र, विदर्भातील तापमान हळूहळू वाढण्याचे संकेत बंड यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)