‘मेरी माटी, मेरा देश' अभियान : महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ
By प्रदीप भाकरे | Published: August 9, 2023 05:01 PM2023-08-09T17:01:00+5:302023-08-09T17:04:52+5:30
१६ ते २० ऑगस्टदरम्यान कार्यक्रम
अमरावती : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त राज्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम ९ ते २० ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बुधवारी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांनी पंचप्रण शपथ घेतली.
या अभियानात शहरामध्ये वसुधा वंदन, शीला फलकम (स्मारक), पंचप्राण शपथ, अमृत वाटीका यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेद्वारे हा उपक्रम १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात नागरिक, शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त पवार यांनी केले. नागरिकांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान अंतर्गत पंचप्रण शपथ घेतल्यानंतर सेल्फी काढून ती मेरे माटी मेरा देश या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे.
यावेळी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त जुम्मा प्यारेवाले, शहर अभियंता इकबाल खान, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, लिना आकोलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, मुख्यलेखाधिकारी प्रविण इंगोले, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, पी.यु.वानखडे, भांडार अधिक्षक मंगेश जाधव, मालमत्ता अधिकारी दिपक खडेकार, उपअभियंता सुनिल चौधरी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.