प्रतिभातार्इंनी मोदींची स्तुती केल्याचा व्हायरल मेसेज धादांत खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:29 AM2018-06-08T11:29:00+5:302018-06-08T11:29:08+5:30

माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग शेखावत (पाटील) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. तो धादांत खोटा असल्याची माहिती प्रतिभातार्इंचे पुत्र व अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

The message of praising Modi by Pratibha Patil is false | प्रतिभातार्इंनी मोदींची स्तुती केल्याचा व्हायरल मेसेज धादांत खोटा

प्रतिभातार्इंनी मोदींची स्तुती केल्याचा व्हायरल मेसेज धादांत खोटा

Next
ठळक मुद्देरावसाहेब शेखावत यांची माहितीकाँग्रेस पक्षाशीच एकनिष्ठ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग शेखावत (पाटील) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. तो धादांत खोटा असून प्रत्यक्षात अशा प्रकारचे वक्तव्य प्रतिभातार्इंनी कधीच केले नसल्याची माहिती प्रतिभातार्इंचे पुत्र व अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदाचा बहुमान मिळालेल्या प्रतिभा देविसिंग पाटील या इंदिरा गांधी यांच्या काळात विरोधी पक्षनेताही होत्या. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्षासाठी विविध पातळ्यांवर कार्यरत राहिलेल्या प्रतिभाताई आजही काँग्रेस पक्षाच्याच विचारधारेवर कायम आहेत. पक्षाशी एकनिष्ठ आहेत. प्रतिभातार्इंच्या नावाचा गैरवापर करून त्यांनी मोदींची स्तुती केल्याचा मेसेज मुद्दामच व्हायरल करण्यात आला. तो षड्यंत्राचा भाग आहे. अफवा पसरविणाऱ्या तत्त्वांचा आम्ही निषेध करतो, असे रावसाहेब शेखावत यांनी कळविले आहे.

Web Title: The message of praising Modi by Pratibha Patil is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.