गोरगरिबांचा बडनेºयातील मोदी दवाखाना दुपारी बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:45 IST2017-10-14T21:44:37+5:302017-10-14T21:45:59+5:30
येथील मोदी दवाखान्याचे बाह्य रूग्ण विभाग दुपारच्या सुमारास बंद राहत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. दिवसभर दवाखाना सुरू ठेवावा, अशी ओरड आहे.

गोरगरिबांचा बडनेºयातील मोदी दवाखाना दुपारी बंदच !
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : येथील मोदी दवाखान्याचे बाह्य रूग्ण विभाग दुपारच्या सुमारास बंद राहत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. दिवसभर दवाखाना सुरू ठेवावा, अशी ओरड आहे. गोरगरिबांचा दवाखाना म्हणून त्याची ओळख आहे.
मोदी दवाखान्यात नाममात्र दरात रुग्णांवर उपचार होतात. दररोज मोठ्या संख्येत रुग्ण तपासणीसाठी येतात. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत व त्यानंतर सायंकाळी पाच ते सात तपासण्याची वेळ निश्चित आहे. केवळ सहा तासच रुग्णांच्या तपासणीसाठी आहे त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील एकमेव वैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. दुपारी १ वाजेनंतर हा दवाखाना सायंकाळपर्यंत बंदच असतो. ग्रामीण रुग्णांना बडनेºयात येण्यासाठी हाच वेळ सोयीचा असल्याने मोदी दवाखान्यात रुग्ण तपासण्यासाठी येतात. दुपारच्या वेळेत विविध गावखेड्यांतून आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागत आहे. भाड्याचा खर्च व उपचाराविना परत जाण्याच्या मन:स्तापाने रुग्ण त्रस्त झाले आहे. हा दवाखाना सकाळी ९ ते रात्री ९ असे १२ तासांचा करावा, असे बडनेरा शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये बोलले जात आहे. त्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करावी, ज्यामुळे खासकरवून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सोयीचे ठरेल. बडनेºयातला मोदी दवाखाना हा मीनी इर्विन म्हणून आहे. गोरगरिबांच्या सोयीचा आहे. महापालिका प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवावा
मोदी दवाखान्यात १५ दिवसांपूर्वी सिरीन्जचा तुटवडा होता. विषाणूजन्य तापाची साथ आहे. सिरीन्ज नसल्याने रुग्णांना बाहेरून विकत आणावी लागली. संबंधित प्रशासनाने त्याची दखल घेतली. मोदी दवाखान्यात गोरगरीब, सर्वसाधारण परिस्थिती असणारे रुग्ण आहेत. औषधांचा तुटवडा होऊ नये, असे रुग्णांमध्ये बोलले जात आहे.