रेती तस्करी रोखण्यासाठी मध्यरात्री कोम्बिंग आॅपरेशन

By Admin | Published: January 10, 2015 12:14 AM2015-01-10T00:14:30+5:302015-01-10T00:14:30+5:30

जिल्ह्यात रेतीघाटाचा लिलाव होण्यास विलंब होत असल्याने मध्यरात्री अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एसडीओ व तहसीलदारांना प्राप्त झाली.

Mid-day Combing Operation to prevent trafficking | रेती तस्करी रोखण्यासाठी मध्यरात्री कोम्बिंग आॅपरेशन

रेती तस्करी रोखण्यासाठी मध्यरात्री कोम्बिंग आॅपरेशन

googlenewsNext

रेती तस्करी रोखण्यासाठी मध्यरात्री कोम्बिंग आॅपरेशन
धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात रेतीघाटाचा लिलाव होण्यास विलंब होत असल्याने मध्यरात्री अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एसडीओ व तहसीलदारांना प्राप्त झाली. दोन दिवसांपासून तालुक्यात महसूल विभागाने मध्यरात्री कोम्बिंग आॅपरेशन राबवून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.
धामणगाव तालुक्यात रेतीपासून सर्वाधिक महसूल मिळतो़ परिसरात वर्धा नदीचे पाच घाट आहेत. या रेतीचा लिलाव अद्यापही झाला असल्याने मध्यरात्री अवैध रेती उत्खनन तसेच वाहतुकीला उधाण आले आहे़ चांदूररेल्वेचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे व धामणगावचे तहसीलदार संजय गरकल यांनी दोन दिवसांपासून अवैध रेती तस्करांविरूध्द दंड थोपाटले आहे़ मध्यरात्री मंगरूळदस्तगीर, देवगाव, अंजनसिंंगी भागात दौरे सुरू केले़ दरम्यान, तळेगाव दशासर भागातून सर्वाधिक अवैध रेतीची वाहतूक मध्यरात्री होत असल्यामुळे महसूल विभागाने विशेष लक्ष दिले आहे़ यात महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी असल्याची तक्रार महसूल विभागाला प्राप्त झाली आहे़ त्यामुळे देवगाव ते तळेगाव दशासर महामार्गावर अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक पकडून दंड न केल्याचे आढळल्यास या कर्मचाऱ्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले
उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार संजय गरकल यांनी मध्यरात्री तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरूध्द कोंबिंग आॅपरेशन सुरू केले़ यात देवगाव कडून धामणगाव येथे येणारे रेतीचे ट्रक नारगावंडीनजीक पकडण्यात आले़ थेट दत्तापूर पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांनी फिर्याद नोंदविली आहे़ यावेळी भरारी पथकात मंडळ अधिकारी संजय मांडवगणे व तलाठी कांबळे यांचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mid-day Combing Operation to prevent trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.