भगतसिंग चौकातील दारूचे दुकान स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:03 PM2017-09-13T23:03:25+5:302017-09-13T23:03:54+5:30

जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बंद आहे.

Migrate the liquor shop in Bhagat Singh Chowk | भगतसिंग चौकातील दारूचे दुकान स्थलांतरित करा

भगतसिंग चौकातील दारूचे दुकान स्थलांतरित करा

Next
ठळक मुद्देमहिलांचा एल्गार : शाळेपासून हाकेच्या अंतरावर दुकान

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बंद आहे. मात्र राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानंतर सदर दुकान सुरू होण्याच्या तयारीत असताना परिसरातील महिला व पुरुषांनी हे दुकान याठिकाणी सुरू करू नये. दुसरीकडे स्थलांतरित करावे, अशा आशयाचे निवेदन सोमवार ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे दिले अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
भगतसिंग चौकातच देशी दारूचे दुकान असून ते सध्या बंद आहे. मात्र शासनाच्या निर्णयामुळे हे दुकान त्याच जागेवर पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती परिसरवासियांना मिळताच शेकडो महिला व पुरुषांनी याठिकाणी देशी दारुचे दुकान सुरू करू नये, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. जेथे दारूचे दुकान होते तेथून हाकेच्या अंतरावर गांधी प्राथमिक शाळा आहे. नवनाथ मंदिर, दत्त मंदिर, उद्यान वस्त्या तसेच रेल्वेस्थानकाकडे जाणारा मार्ग आहे. या दारूच्या दुकानाचा प्रचंड मन:स्ताप या सर्वांना सहन करावा लागत होता. गेल्या चार महिन्यांपासून येथील देशी दारूचे दुकान बंद असल्यामुळे परिसरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुन्हा दुकान सुरू झाल्यास मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागेल, असे जिल्हाधिकाºयांना सादर निवेदनात म्हटले आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील देण्यात आला. यावेळी नगरसेविका गंगा आंभोरे, छाया अंबाडकर, मेघा भगत, कल्पना चिरडे, अलका अंबाडकर, शालिनी टारपे, सरिता ईखार, नीलेश आजनकर, प्रदीप पवित्रकार, मोहन तायडे, बबन दारोकार, संजय चवरे, सुधीर मोडक यांच्यासह इतरही महिला-पुरुष उपस्थित होत्या.
दारू दुकान हटविण्यासाठी मतदान घ्यावे
३५ वर्षांपासून जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील दुकान अनेकांना मन:स्तापाचे ठरले होते. दारूड्यांच्या गराड्यातून शाळाकरी मुला-मुलींना परिसरातील महिलांना जावे लागत होते. अनेक वर्षांपासून विविध संघटनांनी येथील दुकान हटविण्यासाठी आंदोलन छेडले होते. सध्या या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुन्हा सुरू झाल्यास महिलांनी या दारूच्या दुकानाविरोधात मतदान घेण्याची तयारी जिल्हाधिकाºयांकडे बोलून दाखविली.

भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान स्थलांतरित झाले पाहिजे. सध्या हे दुकान बंद आहे. पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे. शाळकरी मुलांसह परिसर वासियांना मोठा मन:स्ताप होत असतो.
- गंगा आंभोरे,
नगरसेविका

Web Title: Migrate the liquor shop in Bhagat Singh Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.