तक्रारी असलेल्या मद्य विक्रीची दुकाने स्थलांतरित करा

By admin | Published: September 10, 2015 12:07 AM2015-09-10T00:07:23+5:302015-09-10T00:07:23+5:30

ज्या मद्यविक्रीच्या दुकानामुळे सर्वसामान्य व्यक्ती तसेच महिला व विद्यार्थ्यांना असुविधा निर्माण होत आहे.

Migrate liquor shops to complaint | तक्रारी असलेल्या मद्य विक्रीची दुकाने स्थलांतरित करा

तक्रारी असलेल्या मद्य विक्रीची दुकाने स्थलांतरित करा

Next

पालकमंत्री : उत्पादन शुल्क विभागाचा आढावा
अमरावती : ज्या मद्यविक्रीच्या दुकानामुळे सर्वसामान्य व्यक्ती तसेच महिला व विद्यार्थ्यांना असुविधा निर्माण होत आहे. या दुकानांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी मद्य विक्रीची दुकाने तत्काळ चौकशी करुन स्थलांतरित करा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पालकमंत्र्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षिका उषा वर्मा बैठकीला उपस्थित होत्या. दारु दुकानं हटविण्याबाबत काही भागातील नागरीकांच्या पालकमंत्र्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्यात या तक्रारींवर योग्य चौकशी करण्या बाबत त्यांनी निर्देश दिलेत.
शहरातील वडाळी, फ्रेजरपुरा, नवसारी, भाजीबाजार तसेच आष्टी, वलगाव, घुईखेड येथे दारु दुकानांमुळे त्या परिसरातील नागरीकांना त्रास होत असल्याची माहिती पालकमंत्र्यानी दिली. ज्या मद्य विक्री दुकानाबाबत तक्रारी आहेत त्या दुकानांचे स्थलांतरण नागरिकांना त्रास होणार नाही अशा अन्य ठिकाणी करावे.
संबंधित परवाना धारकांना न्यायालयाची स्थगिती मिळणार नाही, अशी कायदेशीर ठोस कार्यवाही करावी. मद्यविक्री दुकान चालविण्याचा परवाना ज्यांचे नावे आहे त्या व्यक्तीनेच प्रत्यक्षात दुकान चालवावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
राज्य उत्पादन शुल्क च्या वतीने अवैध मद्य विक्री दुकानांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे, जप्त केलेला मुद्देमाल तसेच अटी व शर्तीचा भंग केलेल्या परवानाधारकांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अधीक्षिका उषा वर्मा यांनी दिली. १४ अनुज्ञप्ती (मद्यविक्री परवाने) बाबत लोकांच्या तक्रारी आहेत त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Migrate liquor shops to complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.