४४५ कुटुंबांचे स्थलांतरण अडले

By Admin | Published: March 7, 2016 12:01 AM2016-03-07T00:01:45+5:302016-03-07T00:01:45+5:30

निम्नवर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ३ गावांतील ४४५ कुटुंबांचे स्थलांतरण पुनर्वसनाअभावी अडले आहे.

The migration of 445 families was stuck | ४४५ कुटुंबांचे स्थलांतरण अडले

४४५ कुटुंबांचे स्थलांतरण अडले

googlenewsNext

निम्नवर्धा प्रकल्प : नऊ गावांचे पुनर्वसन
अमरावती : निम्नवर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ३ गावांतील ४४५ कुटुंबांचे स्थलांतरण पुनर्वसनाअभावी अडले आहे. नागरी सुविधांची कामे झाली नसल्याने भूखंड वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. २० वर्षांपासून पुनर्वसन प्रक्रिया थंडबस्त्यात आहे.
वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यातील अनेक गावे निम्नवर्धा प्रकल्पाने बाधित झाली आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील वरुड बगाजी, येरली, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर, बऱ्हाणपूर, धारवाडा, दुर्गवाडा आणि पिंपळखुटा ही गावे बुडित क्षेत्रात असल्याने या गावांचे पुनर्वसन स्थळ निश्चित आहे. यापैकी वरुड बगाजी, मंगरुळ दस्तगीर, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर आणि बऱ्हाणपूर या ६ गावातील कुटुंब पुनर्वसनस्थळी स्थलांतरित झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे.
साधारणत: १९९५ पासून या गावांमध्ये पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. निम्नवर्धा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ९ गावातील १६४४ कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ आली. त्यापैकी ६ गावांतील ११९९ कुटुंब पुनर्वसनग्रामात स्थलांतरीत झाली. मात्र, उर्वरित ३ गावांतील ४४५ कुटुंबांना पुनर्वसनाची आस लागली आहे. ९ गावातील कुटुंबांसाठी पुनर्वसित गावांत १७०० भूखंड पाडण्यात आले. पैकी १३५८ भूखंडांचे वाटप करण्यात आले. उर्वरित ३४२ भूखंड वाटपाची प्रक्रिया रखडली आहे.

पिंपळखुट्याच्या विद्युतीकरणाला मुहूर्तच नाही
निम्नवर्धा प्रकल्पात पिंपळखुटा गाव अंशत: बुडीत क्षेत्रात आहे. येथील २४ कुटुंबांचे स्थलांतरण गाव क्षेत्रातील आहे. त्यासाठी ४८ भूखंड पाडण्यात आलेत. त्यापैकी १५ भूखंडांचे वाटप करण्यात आलेत. नागरी सुविधांची कामे सुरू असले तरी कुर्मगती आहे. येथे बाह्यविद्युतीकरण रखडले आहे. हे काम करण्यास विदर्भ जलविद्युत मंडळ, नागपूरला अद्याप मुहूर्त गवसलेला नाही.

नागरी सुविधा ३० टक्क्यांवरच
दुर्गवाडा येथील २१८ कुटुंबांसाठी आलवाडा येथे २३८ भूखंड पाडण्यात आले. मात्र, वितरण रखडले आहे. नागरी सुविधांच्या कामाचे घोडे ३० टक्क्यांवर अडले आहे. सुविधा नसल्याने कुटुंबांचे स्थलांतरण आणि भूखंड वाटपही होऊ शकले नाही. विशेष म्हणजे बुडित क्षेत्रातील खरेदी-विक्री व्यवहारावर शासनाकडून टाच आल्याने बाधितांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत.

घोडे कुठे अडले ?
निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील ९ पैकी ३ गावातील कुटुंबांचे स्थलांतरण योग्य पुनर्वसनाअभावीच रखडले आहे. धारवाडा येथील २०३ कुटुंबांचे पुनर्वसन गावानजीकच आहे. मात्र, पुनर्वसन स्थळावर बसस्थानक, स्मशानभूमी, रोड, बाजार ओटे, हॅन्डपंप, बांधकाम विहीर व नळयोजनांचे काम कुर्मगतीने सुरू आहे. २०३ पैकी १४५ भूखंडांचे वाटप करण्यात आले आह. भूखंड वाटप रखडल्याने प्रकल्पग्रस्तांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी होत आहे.

Web Title: The migration of 445 families was stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.