अपघातानंतर जमावावर सौम्य लाठीचार्ज

By admin | Published: February 25, 2016 12:03 AM2016-02-25T00:03:54+5:302016-02-25T00:03:54+5:30

अपूर्वा देऊळकर हिच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच मार्गावर एका ट्रकने रिव्हर्स घेताना तीन दुचाकींना धडक दिल्याने ...

Mild lathi charge on the crowd after the accident | अपघातानंतर जमावावर सौम्य लाठीचार्ज

अपघातानंतर जमावावर सौम्य लाठीचार्ज

Next

अंबादेवी-गांधी चौक मार्गावरील घटना : ट्रकची तीन दुचाकींना धडक
अमरावती : अपूर्वा देऊळकर हिच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच मार्गावर एका ट्रकने रिव्हर्स घेताना तीन दुचाकींना धडक दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अंबादेवी ते गांधी चौक दरम्यान घडलेल्या या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड करून ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना नागरिकांची गर्दी पांगवीण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
माहितीनुसार मंगळवारी रात्री अंबादेवी मार्गाने गांधी चौकाकडे जाणाऱ्या ट्रक एमएच ३१-९५९९ अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने चालकाने ट्रक विरुध्द दिशने मार्गालगत नेऊन थांबविला. तेथून तो ट्रक मागे घेण्यासाठी चालकाने रिव्हर्स घेतला असता अचानक मागून येणाऱ्या एम.एच. २७ ए.सी.-२६३१, टी.सी.एम.एच. २७ व एम.एच. २७ बी. १७८३ या तिन्ही दुचाकींवर जाऊन धडकला. सुदैवाने या अपघाताच प्राणहानी झाली नाही. मात्र, एका दुचाकीचे नुकसान झाले. या अपघाताची माहिती आजूबाजूच्या परिसरात पसरताच काही वेळात शेकडो नागरिकांची गर्दी घटनास्थळी गोळा झाली. अपूर्वा देऊळकर हिचा मृत्यू चुनाभट्टीजवळच झाला होता. पुन्हा ट्रकने एकास चिरडल्याची अफवा चुना भट्टीत परिसरात पसरल्याने काही नागरिक अपघातस्थळी धावून गेले. काही संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक सुरु केली.
ट्रकच्या काचा फोडून ट्रक जाळण्याचा प्रयत्न सुध्दा केला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस उपायुक्त नितीन पवार पोलिसांचा ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिक ट्रकची तोडफोड करताना पोलिसांना आढळून आले. तसेच ट्रक जाळण्याचा बेतात असताना पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली. मात्र, या अपघातामुळे गांधी चौक परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुध्दा लावण्यात आला. शहर कोतवाली पोलिसांनी ट्रक जप्त केला. ट्रकचालक बडनेरा येथील रहिवासी अजय तुमसरेला ताब्यात घेतले. नगरसेवक दिनेश बूब यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली.

Web Title: Mild lathi charge on the crowd after the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.